Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भ्रष्टाचाराचे कुरण भाग : ३ वसुलीसाठी नियमबाह्य नियुक्ती..? वन विभागात होतेय “यांच्या” नावाची चर्चा..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मनोज सातवी,कार्यकारी संपादक 

ठाणे, 26 डिसेंबर : ठाणे मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील भ्रष्टाचाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. केवळ आर्थिक वसुलीसाठी या कार्यालयात एका निवृत्त कर्मचाऱ्याला नियमबाह्य पद्धतीने सेवेत रुजू करून घेतले आहे. अरुणकुमार जाधव असे या कर्मचाऱ्याचे नाव असून जाधव हे जुन २०२३ मध्ये लेखापाल पदावरुन निवृत्ती झाले आहेत. परंतु निवृत्त नंतर जाधव यांना पुन्हा लेखापाल पदावर डहाणू उपवनसंरक्षक कार्यालयात घेतलं गेलं, प्रत्यक्ष कामावर मात्र ठाणे मुख्यालयात ठेवले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विशेष म्हणजे क वर्गातील कर्मचाऱ्याला नियमानुसार पुन्हा कामावर ठेवता येत नाही. तरीही निवृत्त अरुणकुमार जाधव यांना लेखापाल पदाचा पगार दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी काही कर्मचाऱ्यांनी तक्रारी देखील केल्या मात्र त्यांना कार्यालय अधीक्षक  गिऱ्हे आणि आणखी एका अधिकाऱ्याने केराची टोपली दाखवून हे प्रकरण दाबल्याचा आरोप होत आहे.

अरुणकुमार जाधव हे भारतीय वायुदलात सेवेसाठी होते. वायुदलातून निवृत्त झाल्यावर जाधव हे वन विभागात रुजू झाले. गिऱ्हे आणि इतर अधिकाऱ्याने त्यांना जमिन संदर्भातील टेबलला (सेक्शन)बसवले. डहाणू उपवनसंरक्षक कार्यालयात लेखापाल म्हणून दाखवत ते ठाणे सिसीएफ कार्यालयात एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हाताखाली जमिन विभागात काम करत आहेत. मुळात जाधव हे जुन २०२३ मधे निवृत्त होऊनही त्यांना पुन्हा लेखापाल पदावर डहाणू येथे घेतलं मात्र त्यांना कामावर ठाणे मुख्यालयात ठेवले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुख्य वनसंरक्षक कार्यालय ठाणे यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेट्रो, बुलेट ट्रेन, रेल्वे कॉरिडॉर, मुंबई -वडोदरा एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग, रिलायन्स गॅस पाईपलाईन असे मोठ मोठे शासकिय आणि खासगी विकास प्रकल्प सुरू आहेत. मात्र या विकास प्रकल्पांच्या माध्यमातून सरकारी अधिकारी आणि दलालांना भ्रष्टाचाराची नवनवीन कुरणं मिळत आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे याच मलईदार विभागात जाधव यांना केवळ आर्थिक वसुलीसाठीच नियमबाह्य पद्धतीने घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यावर इतकी मेहरबानी का ?

अरुणकुमार जाधव हे भारतीय वायुदलाचे तसेच, वन विभागाचे पेन्शन घेत असून त्यात आता लेखापालचा पगार देखील घेत आहेत. जिल्ह्यातील विकास प्रकल्पामधील वन विभागाशी संबंधित जमिनींच्या प्रकरणात जमिनीची मोजणी करून देणे, वन हक्क दावेदार, कागदपत्री मालकी असणारे, आणि प्रत्यक्ष ताबा असलेले प्रकल्प बाधित यांच्यामध्ये नुकसान भरपाई मिळण्याच्या प्रकरणांमध्ये दलाल आणि अधिकारी यांच्या मार्फत मोठे आर्थिक गैरव्यवहार केले जातात. आणि हे मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील जमीन विभागात होत असल्याचा देखील आरोप आहे.

त्यामुळे राज्यात इतके सुशिक्षित बेरोजगार असताना या निवृत्त कर्मचाऱ्यावर इतकी मेहरबानी का? असा प्रश्न सहाजिकच पडू शकतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर महाराष्ट्र शासन सेवेच्या सर्वसाधारण सेवा शर्थी नियमानुसार भ्रष्टाचाराची आणि गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित असलेल्या या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी काही सामाजिक संस्थांनी वनमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी…

अरुणकुमार जाधव यांच्या नियमबाह्य नियुक्ती पुनर्नियुक्ती प्रकरणी डहाणू उपवनसंरक्षक कार्यालयातील कार्यालय अधीक्षक रामराव राठोड यांना विचारले असता, त्यांनी सुरुवातीला “असं काहीच झालेलं नाही, इथे कोणीही जाधव नाहीत, आम्ही त्यांना ओळखत नाही” असे म्हणून विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकस्पर्श न्युज च्या प्रतिनिधींनी त्यांना याबाबत आणखी खोदून विचारले असता, “आम्ही जाधव यांना तात्पुरती व्यवस्था म्हणून मानधन तत्वावर सेवेत घेतल्याची” कबुली दिली. विशेष म्हणजे जाधव यांचे पुनर्नियुक्ती प्रकरण माझ्यासाठी धक्कादायक असून, याबद्दल मला काहीच माहिती नाही असे श्रीमती मधुमिथा उपवनसंरक्षक डहाणू यांनी सांगितले.तर, दूसरीकडे ठाणे मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर ” अरुणकुमार जाधव यांची नियमबाह्य नियुक्ती आणि चुकीची झाल्याचे सांगितलं.” याबाबत आम्ही मुख्य वनसंरक्षक श्रीमती प्रदीप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही.

नियमबाह्य नियुक्ती विरोधात तक्रारीला केराची टोपली…

विशेष म्हणजे या नियमबाह्य नियुक्ती एका महिला कर्मचाऱ्याने वरिष्ठांना लेखी तक्रार केली होती. मात्र पैसे कमवून देणाऱ्या अजयकुमार जाधव यांचा बचाव करण्यासाठी ठाणे मुख्यालयातील काही अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल न घेता तीला केराची टोपली दाखवली.त्यामुळे अश्या नियमबाह्य कर्मचारी,अधिकारी यांना सेवेतून बाजुला हटविण्याचे धाडस मुख्य वनसंरक्षक , तसेच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी सचिव आणि मंत्री महोदय यापुढे तरी करतील का ? असा सवाल विचारला जात आहे.

कार्यवाहीचे आदेश, मात्र बचावाचा प्रयत्न…

मुख्यमंत्री,वनमंत्री,सचिव, प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे याबाबत सामजिक संघटनांनी तक्रार केल्या नंतर या प्रकरणी कार्यवाही करण्याचे आदेश आले आहेत.असे असतांनाही मुख्य वनसंरक्षक ठाणे कार्यालयातील अधिकारी अरुणकुमार जाधव यांच्या बचावाचा भातुकलीचा खेळ खेळत आहेत हे विशेष.

हे पण वाचा :-

 

CCF कार्यालयात प्रशासकीय अधिकारी व मुख्य लेखापाल यांचा धुडगूस..

https://loksparsh.com/top-news/corrupt-officers-stay-in-ccf-office-for-years-after-being-denied-promotion/40580/

 

Comments are closed.