Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पुसूकपल्ली २०१३ पासून दारूविक्रीमुक्त-ग्रामस्थांचा पुढाकार 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि,२६ : अहेरी तालुक्यातील पुसूकपल्ली येथील अवैध दारूविक्री विरोधात आवाज उठवत ग्रामस्थांनी आपल्या गावाला दारूमुक्त केले. सलग २०१३ पासून दारूबंदी असून या यशाचे प्रतीक म्हणून गावकऱ्यांनी नुकतेच गावात विजयस्तंभ उभारला आहे.

पुसूकपल्ली येथे २०१३ पूर्वी अवैध दारूविक्री सुरु होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पुसूकपल्ली गावाची त्यावेळची परिस्थिती बघितली असता, २०१३ पूर्वी अवैध दारूविक्री सुरु होती.त्यामुळे व्यसनाचे प्रमाण वाढले होते. सोबतच शिक्षणाचे प्रमाण खुंटले होते. महिलांसह ग्रामस्थांना सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागत होता. अशातच मुक्तिपथ गाव संघटना व ग्रामस्थांनी गावातून अवैध दारूविक्री हद्दपार करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन केले.

यामध्ये अवैध दारूविक्री बंदीचा ठराव पारित करण्यात आला. सोबतच नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांकडून १० हजारांचा दंड वसूल करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच विविध उपक्रम राबवून गावाला अवैध दारूविक्रीच्या जाळ्यातून मुक्त केले. आता सलग २०१३ पासून गावात अवैध दारूबंदी आहे. मागील १० वर्षांपासून निर्णयाची अंमलबजावणी सुरु आहे. ग्रामस्थांनी केलेल्या या यशस्वी प्रयत्नांची महिती इतरही गावांना व्हावी, या हेतून नुकतेच गावात मुक्तीपथ गावसंघटनच्या माध्यमातून विजयस्तंभ उभारून विजयोस्तव साजरा करण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या निमित्त सायंकाळी गावात घरोघरी सळा-रांगोळी टाकून गावात मशाल रॅली काढण्यात आली. रॅली अंतर्गत आमच्या गावाची प्रेरणा जिल्हाभर माहिती व्हावी, या हेतुने घोषवाक्य देऊन गडचिरोली जिल्ह्यात दारू कारखाना रद्द करण्याबाबत मोठ्या प्रमाणात लोकांनी सह्या करून प्रस्ताव पारित केला. विजयस्तंभाचे उदघाट्न गाव संघटनेच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातील प्रतिष्टीत मान्यवर राकेश कुळमेथे, शेवंता भोयर, जिजाबाई काटलवार,  मुक्तीपथ तालुका संघटक राहुल महाकुलकार, भूषण गौरी यांच्यासह गावसंघटन सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.