Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अयोध्येच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीतल्या महादवाडी येथे धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 22 जानेवारी – अयोध्या येथे संपन्न झालेल्या भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्यातल्या महादवाडी या गावात देखील विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. सकाळी गावात भगवान श्रीरामाची सवाद्य पालखी यात्रा काढण्यात आली.

जय श्रीरामच्या जय घोष्याने संपूर्ण गाव दुमदुमत गेले होते. त्यानंतर दुपारी श्रीराम मंदिरातून कलश यात्रेचा पारंभ झाला. पूर्ण गावातून पालखी काडून श्री हनुमान मंदीरात पोहचली. यावेळी रथामध्ये श्री राम, लक्ष्मण, सीता माईची आणि हनुमानची वेशभूषा साकारलेली मुलं सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सर्वत्र भगवे झेंडे आणि मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाई यामुळे गावातील वातावरण भक्तिमय झाले होते. महादवाडी गावाचे गाव पुजारी गजानन महाराज यांच्या पुढाकाराने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

https://youtu.be/aApTCe6MMfohttps://youtu.be/aApTCe6MMfo

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.