Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भ्रष्टाचाराचे कुरण: भाग 6 – ‘त्या ‘ भ्रष्ट अधिकाऱ्यांची हकालपट्टी करा.. अन्यथा सामूहिक आत्मदहन करणार…

ठाणे वनवृत्तातील पीडित लिपिक,वनरक्षकांचा ठाणे CCF यांना इशारा..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

ठाणे, 25 जानेवारी-  ठाणे मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी सोपान गिऱ्हे, मुख्य लेखापाल चंद्रकात सोनजे, नुकताचशहापूर येथे हजर झालेले ए बी सांगळे, तसेच नियमबाह्य पद्धतीने पुन्हा लेखापाल पदावर घेतेलेले अरुणकुमार जाधव यांच्या भ्रष्टाचारामुळे त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सीसीएफ के प्रदीपा यांना अखेरचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास येत्या ३० जानेवारी रोजी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ठाणे मुख्य वनसंरक्षक कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.

ठाणे वनवृत्तातील लिपिक संवर्गातून वनरक्षक संवर्गात संवर्ग बदली प्रकरणांमध्ये मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वरिष्ठांची दिशाभूल करत अर्जदारांवर अन्याय केला चा आरोप करण्यात आला आहे. संवर्ग बदलीचा पहिला अर्ज उपवनसंरक्षक, शहापूर यांच्या कार्यालयाकडून ठाणे मुख्य वनसंरक्षक कार्यालयाला दिनांक 13. एप्रिल 2022 रोजी प्राप्त झालेला होता. त्यानंतर इतर अर्धे देखील प्राप्त झाले होते परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केवळ संवर्ग बदली प्रकरणात आर्थिक मलई लाटण्यासाठी सर्व अर्ज वरिष्ठ कार्यालयांकडे वर्ग न करता आपल्याकडेच राखून ठेवले.
जर संवर्ग बदली बाबत प्रशासकीय अधिकारी यांना संभ्रम होता तर त्यांनी पहिला अर्ज प्राप्त होताच वेळीचं कार्यवाही करुन वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागणे आवश्यक होते. परंतु त्यांनी सदरच्या अर्जावर याबाबत कुठलीही कार्यवाही केली नाही. त्यांनी हे अर्ज जवळपास नऊ महिने स्वतःकडे दडवून ठेवले. त्यामुळे सदर अर्जांवर वेळेत पाठपुरावा न झाल्यामुळे संबंधित अर्जदार संवर्ग बदलीच्या लाभापासून वंचित राहिले. परंतु त्याचवेळी राज्यातील इतर वनवृत्तात कर्मचा-यांच्या विनंती नुसार संवर्ग बदलीचे आदेश देणेत आले आहेत. त्यामूळे त्यांना ज्या नियमान्वये आदेश देणेत आले आहेत, तेच नियम आम्हालाही लागु होतात. म्हणून आमचा काहीही दोष नसताना केवळ अर्जदारांकडून आर्थिक वसुली करणे हाच एकमेव उद्देश प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्या गैरव्यवहारात सामील असलेले इतर अधिकारी यांचा होता असा आरोप करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कारवाई करा, अन्यथा आत्मदहनचा इशारा..?
“प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्या भ्रष्ट बगलबच्चांनी जाणीव पुर्वक व हेतु पुरकृत आर्थिक लोभापोटी संवर्ग बदली प्रकरणात वरिष्ठांची दिशाभुल केली असून या सर्व अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, दप्तर दिरंगाई करणे, नाकर्तेपणा, मनमाणी, वेळकाढुपणा या सर्वांची सखोल चौकशी होवून त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आम्ही सर्व अर्जदार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार असून, या सर्वांना संबधित अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील” असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

कारवाईचा केवळ दिखावा..?
ठाणे मुख्य वनसंरक्षक कार्यालयात सुपर बॉस बनून राहिलेल्या प्रशासकीय अधिकारी सोपान गिऱ्हे,मुख्य लेखापाल चंद्रकात सोनजे, ए बी सांगळे यांच्या विरोधात दबक्या आवाजात पिडीत कर्मचारी आवाज करत होते. काही सामाजिक संघटनांनी तक्रारी केल्या नंतर कर्मचाऱ्यांचा आवाज बनत लोकस्पर्श न्युज ने बातम्यांच्या माध्यमातून ठाणे सिसीएफ के. प्रदीपा यांच्या कानावर कर्मचाऱ्यांची व्यथा पोहचवली. मात्र सिसीएफ के. प्रदीपा यांच्यावरही दबाव ठेवून बसलेल्या या भ्रष्ट अधिकारी,कर्मचाऱ्यांवर केवळ कारवाईचा दिखावा करण्यात आला, तो देखील या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठीच असा आरोप केला जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे मुख्य वनसंरक्षक हतबल..?

मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी,कर्मचाऱ्यांविरोधात मुख्यमंत्री,वनमंत्री,सचिव,प्रधान मुख्य वसंरक्षक यांच्याकडे तक्रारी केल्या गेल्या. त्यानंतर संबंधित कार्यालयाकडून कार्यवाहीचे आदेश सिसीएफ यांना आले. मात्र राजकिय लोकांशी,बड्या अधिकाऱ्यांशी आपली ओळख असल्याचा धाक दाखवत असल्याने सिसीएफ के प्रदीपा या अधिकारी,कर्मचाऱ्यांपुढे हतबल असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सिसीएफ यांनी या भ्रष्ट अधिकारी,कर्मचाऱ्यांची चौकशी लावली. मात्र गिऱ्हे,सोनजे यांची कुठेही बदली न करता त्यांना मुख्यालयातील पदावर कायम ठेवले अश्यात पारदर्शक चौकशी कशी होणार ? असा कर्मचाऱ्यांचा सवाल आहे. आता वनमंत्री, प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या आदेशा नंतर तरी सिसीएफ के. प्रदीपा हिंमत करत या प्रशासकीय अधिकारी सोपान गिऱ्हे,मुख्य लेखापाल चंद्रकात सोनजे, ए बी सांगळे,अरुणकुमार जाधव यांना सेवेतून हटवत महाराष्ट्र नगरीसेवा शिस्त व अपील नियम १९७९ अंतर्गत सक्त कारवाई करतात की, पीडित कर्मचाऱ्यांची केवळ समजुत काढून कागदी घोडे नाचवून या भ्रष्टाचारांचा बचाव करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे पण वाचा :-

भ्रष्टाचाराचे कुरण भाग: ५, ठाणे वन विभागात सिसीएफ यांच्यावर प्रशासकीय अधिकाऱ्याचा वचक..?

भ्रष्टाचाराचे कुरण भाग: ४ ठाणे मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील अनागोंदी कारभाराविरोधात कारवाईचा केवळ दिखावा…

Comments are closed.