Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

…अखेर ‘लोकस्पर्श न्युज’च्या बातम्यांची विरोधी पक्ष नेत्यांनी दखल घेताच वनविभागात खळबळ !

'त्या' भ्रष्ट CCF कार्यालयातील अधिकाऱ्यांचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे ठाणे CCF यांना पत्र..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मनोज सातवी,

ठाणे दि, २९ फेब्रूवारी : मुख्य वनसंरक्षक ठाणे कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी सोपान गिऱ्हे,चंद्रकांत सोनजे यांच्यावर कारवाई करत अहवाल तत्काळ देण्यात यावा असे आदेश विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मुख्य वनसंरक्षक ठाणे यांना दिले आहेत. ‘लोकस्पर्श न्युज’ ने ठाणे मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कारनाम्यानबाबत ‘भ्रष्टाचाराचे कुरण’ या सदराखाली बातम्या प्रकाशित केल्या होत्या. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांच्या या पत्रानंतर तरी ठाणे सिसीएफ के. प्रदीपा या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का..? असा प्रश्न विचारला जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ठाणे मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी सोपान गिऱ्हे,मुख्य लेखापाल चंद्रकात सोनजे,शहापूर येथे नुकताच हजर झालेले ए. बी. सांगळे,नियमबाह्य सेवेत घेत लेखापाल पदाचा पगार घेतेलेले अरुणकुमार जाधव यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली होती.

या कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या, लेखापरीक्षण,वन जमिन प्रकरणे,लिपिक संवर्गातून वनरक्षक संवर्गात जाण्यासाठी कर्मचाऱ्यांची केलेली फसवणुक यामध्ये कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमविल्याच्या तक्रारी मुख्यमंत्री,विरोधीपक्ष नेते, वन विभागाचे सचिव,ठाणे सिसीएफ यांच्याकडे वेळोवेळी केल्या होत्या. शिवाय पिडीत कर्मचाऱ्यांनी या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी केल्या नंतर मात्र या कर्मचाऱ्यांवर वन विभागातील काही बड्या अधिकाऱ्यांचा हात असल्याने ठाणे सिसीएफ श्रीमती के. प्रदीपा यांनी केवळ दिखावा कारवाई करत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गेल्या तीन महिन्यापासून केवळ चौकशी सुरु असल्याचे उत्तर ठाणे सिसीएफ के प्रदीपा यांनी दिले.मात्र कर्मचाऱ्यांची होणारी फसवणुक आणि आर्थिक लुट करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी सोपान गिऱ्हे, चंद्रकात सोनजे यांची चौकशी करत अहवाल सादर करण्याचे आदेश विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सिसीएफ ठाणे यांना दिले आहेत.

लिपिक संवर्गातून वनरक्षक संवर्गात जाणाऱ्या ११ लिपिकांचा अहवालास विलंब का केला. कर्मचाऱ्यांशी उद्धट भाषा वापरणाऱ्या सोपान गिऱ्हे,चंद्रकात सोनजे यांनी यांची चौकशी सुरु करावी.अन्य कार्यालयात बदली करावी अश्या सूचना विरोधी पक्ष नेत्यांनी ठाणे मुख्य वनसंरक्षक ठाणे यांना दिल्या आहेत.

यापूर्वीही मुख्यमंत्री कार्यालय, वनमंत्र्यांच्या कार्यालयाकडून या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.मात्र ठाणे सिसीएफ के प्रदीपा यांनी कारवाईची हिंमत करू शकल्या नाहीत.

ठाणे मुख्य वनसंरक्षक कार्यालय (CCF OFFICE) हे ठाणे विभागीय उपवनसंरक्षक संतोष सस्ते हे चालवत असल्याची सध्या वन विभागात जोरदार चर्चा सुरू आहे. संतोष सस्ते हे एका माजी वन मंत्र्यांचे “विशेष कार्य अधिकारी” (OSD) होते.त्यामुळे त्यांची मंत्रालय आणि वन विभागात मोठी ओळख असल्याने येथील भ्रष्ट अधिकारी सोपान गिऱ्हे,चंद्रकात सोनजे यांच्यावर कोणतीही कारवाई, किंवा बदली देखील होत नसल्याचे बोलले जात आहे.

अश्यात मुख्यमंत्री, वनमंत्री यांनी यापूर्वी कारवाईचे आदेश देउनही त्यांच्या पत्राला बगल देणाऱ्या के प्रदीपा आता तरी विरोधी पक्ष नेत्यांनी आदेश दिलेल्या कारवाई अहवाल सादर करण्याच्या पत्रावर तरी गिऱ्हे,सोनजे यांच्यावर कारवाईची हिंमत करणार का हे पाहावे लागेल.

हे देखील वाचा,

पदोन्नती नाकारून भ्रष्ट अधिकाऱ्यांचा वर्षानुवर्षे CCF कार्यालयात तळ

पदोन्नती नाकारून भ्रष्ट अधिकाऱ्यांचा वर्षानुवर्षे CCF कार्यालयात तळ

भ्रष्टाचाराचे कुरण भाग : ३ वसुलीसाठी नियमबाह्य नियुक्ती..? वन विभागात होतेय “यांच्या” नावाची चर्चा..

 

CCF कार्यालयात प्रशासकीय अधिकारी व मुख्य लेखापाल यांचा धुडगूस..

CCF कार्यालयात प्रशासकीय अधिकारी व मुख्य लेखापाल यांचा धुडगूस..

 

 

भ्रष्टाचाराचे कुरण भाग: ४ ठाणे मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील अनागोंदी कारभाराविरोधात कारवाईचा केवळ दिखावा…

भ्रष्टाचाराचे कुरण भाग: ५, ठाणे वन विभागात सिसीएफ यांच्यावर प्रशासकीय अधिकाऱ्याचा वचक..?

भ्रष्टाचाराचे कुरण भाग: ५, ठाणे वन विभागात सिसीएफ यांच्यावर प्रशासकीय अधिकाऱ्याचा वचक..?

भ्रष्टाचाराचे कुरण: भाग 6 – ‘त्या ‘ भ्रष्ट अधिकाऱ्यांची हकालपट्टी करा.. अन्यथा सामूहिक आत्मदहन करणार…

 

पदोन्नती नाकारून भ्रष्ट अधिकाऱ्यांचा वर्षानुवर्षे CCF कार्यालयात तळ

 

Comments are closed.