Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत एकाच महिन्यात दुसऱ्यांदा पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा दौरा..

अतिसंवेदनशील पोलीस स्टेशन मन्नेराजाराम आणि पोलीस स्टेशन भामरागड ला दिली भेट..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 29 फेब्रुवारी – देशभरातील होवू घातलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर तसेच माओवाद्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होणारी निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी अतिसंवेदनशील मन्नेराजाराम पोलीस स्टेशनच्या कामकाजाची पाहणी एकाच महिन्यात दुसऱ्यांदा केली आहे. या आधी नवीन करण्यात आलेल्या वांगीतुरे तसेच गर्देवाडा येथे झालेल्या पोलीस स्टेशनचे प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेऊन गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा पोलीस स्टेशन भामरागड येथे उपस्थितीत दर्शवून कृषी मेळावा तसेच बाराव्या कृषीदर्शन सहल व अभ्यास दौरा निमित्त कार्यक्रमात दाखल होवून हिरवी झेंडी दाखवित मान्यवरांच्या उपस्थितीत कृषी मेळावा आयोजित करण्यात आला.

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी आज दिनांक 29 फेब्रुवारी गडचिरोली पोलीस दलास भेट दिली. आगामी काळात येणा­या सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – 2024 गडचिरोली जिल्ह्रातील अतिसंवेदनशील ठिकाणी सुरळीत पार पडाव्यात यासाठी पोलीस महासंचालक यांनी अतिसंवेदनशिल पोस्टे मन्नेराजाराम येथे भेट दिली. भेटी दरम्यान लोकसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर पोस्टे मन्नेराजाराम येथील जवानांची स्टॅण्ड टू ड्रिल घेतली व पोस्टेच्या कामकाजाची पाहणी करुन उपस्थित अधिकारी व अंमलदार तसेच लहान मुले व नागरीकांसोबत संवाद साधला आणि पोस्टेतील जवानांसोबत नाश्ता करुन जवानांचे मनोबल वाढविले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 गडचिरोली जिल्हयातील शेतकरी व इतर जनतेनी आपली आर्थिक प्रगती करावी व विविध तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करावी आणि गडचिरोली पोलीस दलाच्या विविध उपक्रमाचा लाभ घेवुन आपले जीवनमान उंचवावे. कृषी मेळाव्यात हजर नागरिकांना आंबा-40, चिक्कु-40 सिताफळ-40, फणस-40, लिंबू-40 फळझाडांच्या रोपाचे तसेच शेतक­यांना कृषी उपयोगी अवजारे (सब्बल, कृषी स्प्रेपंप, घमेले) साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधतांना पोलीस महासंचालक यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्हयातील शेतकरी व इतर जनतेनी आपली आर्थिक प्रगती करावी व विविध तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करावी आणि गडचिरोली पोलीस दलाच्या विविध उपक्रमाचा लाभ घेवुन आपले जीवनमान उंचवावे. तसेच माओवाद्यांच्या खोट्या चळवळीला बळी न पडता गडचिरोली पोलीस दलाला सहकार्य करुन गडचिरोली जिल्ह्राचा विकास साधावा. यासोबतच गावातील महिलांनी कृषी सहलीच्या माध्यमातून ज्ञान संपादन करुन विविध तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीच्या कामामध्येपुरुषांना हातभार लाऊन आपला व आपल्या परिवाराचा आर्थीक विकास साधावा.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यानंतर गडचिरोली जिल्ह्रातील शेतकरी जिल्ह्राबाहेर पडून, पारंपरिक शेतीला बगल देत विविध क्लृप्त्यांचा वापर करीत अत्याधुनिक शेती करणा­या शेतक­यांच्या बांधावर जावुन तेथील परिस्थितीची, आधुनिक शेती व उपकरणांची पाहणी करतील व त्या ज्ञानाचा वापर करून पारंपरिक शेती पध्दतीत बदल करतील व जिल्ह्रातील महिला शेतक­यांची आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने, उपविभाग एटापल्ली, हेडरी व भामरागड येथील एकुण 45 महिलांसाठी गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून एकुण बाराव्या कृषी दर्शन सहलीचे व सन 2024 मधील पहिल्या सहलीचे आयोजन करण्यात आले. सदर कृषी दर्शन सहल ही दि. 01 फेब्रुवारी पासुन 08 फेब्रुवारी पर्यंत एकुण 08 दिवस आयोजीत करण्यात आली असून, या बाराव्या कृषीदर्शन सहल व अभ्यास दौरा कार्यक्रमास पोलीस महासंचालक  यांनी इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवुन शुभेच्छा दिल्या.

दिवसभर चाललेल्या या सर्व कायक्रमांमध्ये आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, म.रा. मुंबई  शिरीष जैन विशेष पोलीस महानिरीक्षक, नक्षलविरोधी अभियान नागपूर, संदिप पाटील पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल पोलीस अधीक्षक  नीलोत्पल केंद्रीय राखीव पोलीस बल 191 बटा. चे कमांण्डंट एम. एस. खोब्राागडे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते हे उपस्थित होते.

हे पण वाचा :- 

 

Comments are closed.