Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पदोन्नती नाकारून भ्रष्ट अधिकाऱ्यांचा वर्षानुवर्षे CCF कार्यालयात तळ

Thane CCF office भ्रष्टाचाराचे कुरण...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ओमप्रकाश चुनारकर,मनोज सातवी

भाग क्रमांक १,

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ठाणे दि, 29 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील मुख्य वन संरक्षक कार्यालयात (CCF Office)सध्या मनमानी कारभार सुरु आहे. येथील प्रशासकीय अधिकारी आणि मुख्य लेखापाल या आणि इतर काही अधिकाऱ्यांमुळे ठाणे वृत्तातील कर्मचारी आणि पेन्शनर कुटुंब त्रस्त आहेत.

विशेष म्हणजे येथील दोन अधिकाऱ्यांनी चक्क त्यांची झालेली पदोन्नती देखील नाकारली असून, केवळ आर्थिक मलिदा लाटण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून हे दोन अधिकारी या कार्यालयात एखाद्या सापासारखे वेटोळे घालून बसले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ठाण्याच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयामधील मुख्य लेखापाल चंद्रकांत एल. सोनजे आणि अजय बी सांगळे अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. या दोघांनी तसेच इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या भ्रष्ट कारभारातून कोट्यावधी रुपयांची माया जमविली असल्याचा आरोप करत, या अधिकाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे विविध सामाजिक संघटनांनी केली आहे.

 अधिकाऱ्यांनी चक्क पदोन्नती नाकारली...

सरकारी कर्मचारी असो की, खासगी क्षेत्रातल कर्मचारी पदोन्नती मिळावी, यासाठी कोणत्याही क्षेत्रातला कर्मचारी किंवा अधिकारी प्रयत्न करीत असतो. अर्थात तो त्याचा हक्कच असतो. मात्र मुख्य वनसंरक्षक कार्यालयामधील चंद्रकात एल. सोनजे आणि अजय बी सांगळे यांनी चक्क शासनाने दिलेली पदोन्नती नाकारली असून ठाणे सिसीएफ कार्यालयात ठाण मांडून बसले आहेत. यामधील लेखापाल ए. बी.सांगळे हे तर १९९९ पासून ठाणे मुख्य वनसंरक्षक कार्यालयात एकाच जागेवर आहेत. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांची पदोन्नती रखडल्याने त्यांना मोठा फटका बसला आहे.

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि. १४/०७/२०२१ च्या शासन अधिसुचने नुसार राज्यातील मुख्य लेखापाल (गट-क) या संवर्गातून कार्यालय अधिक्षक (गट-ब) (राजपत्रित) या संवर्गामध्ये पदोन्नती देण्यात आली होती. या नुसार चंद्रकात सोनजे, मुख्य लेखापाल (गट-क) यांना ठाणे सिसीएफ कार्यालयातून अमरावती येथे तर, ए बी सांगळे यांची नाशिक येथे कार्यालय अधिक्षक (गट-ब) (राजपत्रित) या संवर्गामध्ये पदोन्नती मिळाली होती. मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांनी चक्क पदोन्नतीच नाकारली आहे आणि एखाद्या सापाप्रमाणे ठाणे वनवृत्त कार्यालयात वेटोळे घालून बसले आहेत.

उडवा उडवी ची उत्तरे…

या संपूर्ण प्रकरणाबाबत आम्ही सांगळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी उडवा उडवी ची उत्तर देत “मी याबाबत जे काही उत्तर द्यायचे ते माझ्या वरिष्ठांना लेखी उत्तर दिले असल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला. तर ठाण्याच्या मुख्य वन संरक्षक अधिकारी श्रीमती के. प्रदीपा यांनी मोबाईलवर प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

नागपूरच्या प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालयाकडून विचारणा…

चंद्रकात एल. सोनजे आणि ए बी सांगळे यांनी शासनाने दिलेली पदोन्नती नाकारल्या प्रकरणाची दखल प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख) महाराष्ट्र राज्य यांचे नागपूर कार्यालयाने घेतली असून याबाबत खुलासा करण्याबाबत ठाणे मुख्य वनसंरक्षक कार्यालयाला पत्र धाडले आहे.

याबाबत लेखापाल ए. बी.सांगळे यांनी त्यांची शहापूर येथील उपवनसंरक्षक कार्यालयात कागदोपत्री बदली दाखवल्याची माहिती मिळाली आहे. परंतु आजही सांगळे हे मुख्य वनसंरक्षक ठाणे कार्यालयात अकाऊंट विभागात काम करत आहेत. केवळ आर्थिक फायद्यासाठी या दोन अधिकाऱ्यांना ठाणे कार्यालय कडून पाठीशी घालण्याचा येत असल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी करत थेट मुख्यमंत्री आणि वन मंत्री आणि संबंधित विभागाच्या सचिवांकडे तकाक्रारकेली आहे. त्यामुळे प्रधान मुख्य कार्यालयाची दिशाभूल करणाऱ्या या अधिकाऱ्यावर कोणती कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

 

Comments are closed.