Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेतकऱ्यांनो सावधान..’तो’ पुन्हा आलाय..! अवकाळी पावसाची हजेरी; शेतकऱ्यांची उडाली अचानक तारांबळ

पहाटेपासून विजांचा कडकडाट, मेघ गर्जना आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाने हजेरी लावली आहे..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मनोज सातवी,

पालघर प्रतिनिधी,दि. 26 नोव्हेंबर :भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात आज २६ नोव्हेंबर रोजी पहाटेपासून विजांचा कडकडाट, मेघ गर्जना आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाने हजेरी लावली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पहाटे पाच वाजल्यापासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील पालघर, वसई, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या परिसरात शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

अवकाळी पावसामुळं कापणी झालेल्या आणि मळणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शिवाय फळपिकांवर आणि रब्बी पिकांनाही या पावसाचा फटका बसण्याची भीती आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पालघर जिल्ह्यामध्ये दि. 25, 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विशेष म्हणजे या तीनही दिवशी पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट’ जारी केला आहे.

त्यानुसार शनिवारी रात्री ते रविवारी सकाळपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान आणि कृषी विभागाने दिला आहे.

पालघरसह ठाणे, मुंबई, रायगड , रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये 25, 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विशेष म्हणजे या तिन्ही दिवशी पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे
अवकाळी पावसामुळं कापणी झालेल्या आणि भाताची मळणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शिवाय फळपिकांवर आणि रब्बी पिकांनाही या पावसाचा फटका बसण्याची भीती आहे. महाराष्ट्रात सध्या थंडी असताना यात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. त्यामूळे भात कापणीची कामे पूर्ण करून घ्यावीत. कापून ठेवल किंवा झोडनी/ मळणी केलेले धान्य झाकून सुरक्षित ठिकाणी ठेवावे पारिपक्व भाजीपाला, फुले व फळांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी जेणेकरून आपले नुकसान होणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी.

 

Comments are closed.