Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नवनिर्मीत पोलीस स्टेशन वांगेतुरी येथे जनजागरण मेळाव्याचे आयोजन

महाराष्ट्र राज्याच्या अगदी शेवटी असलेल्या वांगेतुरी हा भाग अतीदुर्गम जरी असला तरी, भविष्यात काही दिवसांमध्ये येथे रस्ते, आरोग्यसेवा या सोयी उपलब्ध करुन दिल्या जाईल.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली पोलीस दलांतर्गत आयोजित  नवनिर्मीत पोलीस स्टेशन वांगेतुरी येथील जनजागरण मेळाव्यास उपस्थित राहुन येथील आदिवासी बांधवांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले.जनजागरण मेळाव्यास उपस्थित नागरिकांना धोतर, साड्या, सलवार, ब्लॅकेट, लोअर, टी-शर्ट, स्वेटर, चप्पल, स्प्रे-पंप, स्वयंपाक साहीत्य (गंज, वाटे, ताट चम्मच इ.) इतर जिवनावश्यक भेटवस्तू तसेच शालेय विद्यार्थ्यांना  सायकल, ड्रेस, नोटबुक, कंपास बॉक्स, बिस्कीट पॉकेट, चॉकलेट्स, व्हॉलीबॉल नेट व बॉल, क्रिकेट साहीत्यांचे वाटप.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली दि,२३ नोव्हेंबर : नवनिर्मीत पोलीस स्टेशन वांगेतुरी येथे जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी केंद्रीय राखीव पोलीस बलाचे पोलीस महानिरीक्षक श पी. एस. रनपिसे, विशेष कृती दलाचे  अपर पोलीस महासंचालक प्रविण साळुंके गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी, यतिश देशमुख तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, हेडरी बापुराव दडस हे उपस्थित होते. 

यावेळी आयोजीत जनजागरण मेळाव्यात वांगेतुरी गाव परिसरातील २०० ते ३०० च्या संख्येने उपस्थित नागरिकांना धोतर, साड्या, सलवार, ब्लॅकेट, लोअर, टी-शर्ट, स्वेटर, चप्पल, स्प्रे-पंप, स्वयंपाक साहीत्य (गंज, वाटे, ताट चम्मच इ.) इतर जिवनावश्यक भेटवस्तू व साहीत्यांचे वाटप केले. तसेच शालेय विद्यार्थ्याना सायकल, ड्रेस, नोटबुक, कंपास बॉक्स, बिस्कीट पॉकेट, चॉकलेट्स, व्हॉलीबॉल नेट व बॉल, क्रिकेट साहित्य (बॅट, स्टम्प्स, बेल्स व बॉल) इत्यादी साहीत्यांचे वाटप करुन मा. अपर पोलीस महासंचालक सा. यांनी उपस्थित नागरिकांना संबोधीत करतांना सांगितले की, या नवीन पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दलातर्फे आपल्या सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न केल्या जाईल व गडचिरोली पोलीस दल राबवित असलेल्या विविध योजनांचा येथील जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा. तसेच महाराष्ट्र राज्याच्या अगदी शेवटी असलेल्या वांगेतुरी हा भाग अतीदुर्गम जरी असला तरी, भविष्यात काही दिवसांमध्ये येथे रस्ते, आरोग्यसेवा या सोयी उपलब्ध करुन दिल्या जाईल. तसेच सदर कामासाठी येथील नागरिकांनी गडचिरोली पोलीस दलास सहकार्य करुन स्वत: पुढाकार घेण्याचे आवाहन करून संपूर्ण पोलीस स्टेशनची पाहणी केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस स्टेशनचे  वांगेतुरीचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी सपोनि. महेश विधाते तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील व सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

हे देखील वाचा,

कारचा भयंकर अपघात; पुण्यातील एकाच कुटुंबातील तीन जण ठार

पनौती’ आणि ‘पाकिटमार’ शब्दांना निवडणूक आयोगाचा आक्षेप; राहुल गांधी यांना पाठवली नोटीस

मोड आलेल्या कडधान्यांच्या ९ हेल्दी रेसिपी नक्की करून पाहा

Comments are closed.