Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पनौती’ आणि ‘पाकिटमार’ शब्दांना निवडणूक आयोगाचा आक्षेप; राहुल गांधी यांना पाठवली नोटीस

२५ नोव्हेंबर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वृत्तसंस्था,दि,२३ नोव्हेंबर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणी राहुल गांधी यांना २५ नोव्हेंबर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.

एका सभेत राहुल गांधी यांनी क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा संदर्भ देत कोणाचेही नाव न घेता पनौती आणि ‘पाकिटमार’ हा शब्द वापरला होता. यानंतर भाजपने राहुल गांधी यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा,

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

३१ डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणार ; आदित्य ठाकरे यांचा दावा

गोंडवाना विद्यापीठात अधिसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

 

Comments are closed.