Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाला निर्णय उद्या

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 03 जानेवारी – संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल उद्या विधानसभा अध्यक्षांकडून दिला जाणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष नेमका काय निकाल देणार? याकडे राज्यासह देशाचंही लक्ष असणार आहे. कारण या निकालाचा परिणाम राज्यातील राजकारणावर होणार आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाला निर्णय ऐतिहासिक असणार आहे. कारण या निर्णयाचे परिणाम फक्त राज्यातील राजकारणावर होणार नाहीत, तर भविष्यात अशा प्रकारच्या प्रकरणावर एक प्रकारे हा निर्णय दाखला देणारा ठरणार आहे.

हा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर फार काही राजकीय घडामोडी घडणार नाहीत. पण ठाकरे गटाला मोठा फटका बसेल. ठाकरे गटाचे आमदार अपात्र होतील. याउलट निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भव्य आणि अभूतपूर्व असा राजकीय भूकंप बघायला मिळेल. या सगळ्या घडामोडी कशा आणि काय-काय घडतील हे आगामी काळात स्पष्ट होईलच, पण त्याआधी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शिवसेना  पक्षात पडलेल्या दोन गटानंतर सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयानंतर सलग तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ विधानसभा अध्यक्षांसमोर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुनावणी पार पडली. शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही बाजूंची युक्तिवाद साक्ष नोंदवली गेली आणि आता वेळ आली आहे, विधानसभा अध्यक्षांना निकाल द्यायची. बजावलेला व्हीप, विधानसभा अध्यक्ष निवड, बहुमत चाचणी, पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचं अशा अनेक मुद्द्यांवर युक्तिवाद झाल्यानंतर आता निकाल कोणाच्या बाजूनं लागणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.