देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात पल्स पोलीओ लसीकरन उत्साहात
गडचिरोली, दि. 31 जानेवारी: देसाईगंज तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात आज सकाळी पल्स पोलिओ लसीकरन उत्साहात सुरू करण्यात आले. याठिकाणी बालकांना दोन बूंद जिंदगी के अर्थात पोलिओ डोज देण्यात येत आहे. पोलिओ लसीकरणाच्या सुरवातीस पहिला डोज देसाईगंज मधील अमायरा पठाण या बालकास पाजण्यात आला.
या वेळी देसाईगंज येथील रहेवाशी भाजप चे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष मा किशन नागदेवें, नगर परिषद उपाध्यक्ष मोतीलाल कूक्रेजा,समाजवादी पार्टी जिल्हा अध्यक्ष इलियास खान,वैद्यकीय अधिकारी डॉ मिसार, डॉ ठक्कर, डॉ इक्बाल, डॉ कोसरे आई पी डी इंचार्ज मेरी विल्सन आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 ते 5 वर्ष पर्यंतच्या आपल्या मुलांना अपंगत्वापासून वाचविण्यासाठी पोलिओ डोज अवश्य पाजावे असे आवाहन या वेळेस किशन नागदेवे यांनी केले.
Comments are closed.