Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पुणे महापालिका सज्जच, पण काळजी घ्या : महापौर मुरलीधर मोहोळ

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • आठवडाभरात वाढलेल्या रुग्णसंख्येसंदर्भात आढावा बैठक
  • तातडीने पावले उचलण्याच्या महापौरांच्या सूचना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क 17 फेब्रुवारी :- ‘मागील आठवड्यात असणारा कोरोनाचा ४.६ टक्के इतका पॉझिटिव्हीटी दर आता १२.५ टक्क्यांवर पोहोचला असून उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तातडीने आढावा बैठक घेत विविध सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. ‘संसर्ग वाढत असला तरी तो नियंत्रणात असून आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत. शिवाय पुणेकरांनी काळजी न करता, काळजी घ्यावी’, असे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरोना आढावा बैठकीला उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे तसेच आरोग्य विभागातील अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

महापौर मोहोळ म्हणाले की, ‘कोरोनाबाधित उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची कमी होणारी संख्या गेल्या दहा-बारा दिवसांपासून वाढू लागली आहे. सिंहगड रोड, नगर रोड, बिबवेवाडी आणि वारजे क्षेत्रीय कार्यालय परिसरात संसर्ग वाढताना दिसत आहे. याभागात संसर्ग वाढला तर पुन्हा कंटेन्मेंट झोन सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागेल.’

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सध्या शहरात १७ स्वॅब सेंटर सुरू आहेत. दिवसाला ३०००-३५०० हजार स्वॅब टेस्ट केल्या जात आहेत. चार वॉर्ड ऑफिस परिसरात नव्याने स्वॅब कलेक्शन सेंटर वाढविण्यावर निर्णय घेण्यात आला आहे,’ अशी माहिती महापौर मोहोळ म्हणाले.

महापौर मोहोळ म्हणाले की,’ सध्या कोणतेही निर्बंध नव्याने लागू करण्याचा महापालिकेचा विचार नसला तरी मोठी खबरदारी घेत आहोत. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाईची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाणार आहे, तसेच लग्न समारंभाच्या नागरिकांच्या संख्येवरील निर्बंधाचे बंधन कठोर करण्याचा विचार केला जात आहे.’

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.