Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

” रवि भांदककार ” अहेरी नगर पंचायतचे स्वच्छता ब्रँन्ड अम्ब्यास्याडर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी, 31 मार्च :- नगराचे प्रथम न्यायप्रविष्ट नगरपंचायत अहेरी येथे स्वच्छोत्सव 2023 नुसार स्वच्छता यात्रा अंतर्गत प्रतिज्ञा समर्पण कार्यक्रमाचे औचित्य साधुन आज दिनांक 31 मार्च 2023 ला नगरपंचायत अहेरी येथे मास्टर्स जागतीक कराटे विजेता 22 थायलंड बँकाॅक सेन्साई रवि भांदककार यानां ब्रँन्ड अम्बेसिडर म्हणून गौरव करून प्रशासकीय स्तरावर सम्मान करण्यात आला.

सेन्साई रवि भांदककार यांनी अहेरी नगराचे नाव तसेच विदर्भ, महाराष्ट्र व देशाचे नाव जागतीक स्तरावर सोनेरी अक्षरात कोरले. याकरीता नगरपंचायत अहेरी कडुन त्यानां हा सम्मान देण्यात आला. करीता त्यांनी आभार व्यक्त करुन धन्यवाद केला आहे सोबतच आज चिमुकल्या मुलीवर समाजकंटकाव्दारे होत असलेल्या अन्यायाविरोधात त्यानां आत्मसंरक्षाणाचे धडे देऊन स्वयंरक्षीत बनविण्याकरीता ते सतत मुलीनां कराटे मार्शल आर्टचे प्रशिक्षण देत आहेत. सध्या ते एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अहेरी अतंर्गत शासकीय आश्रम शाळेत कंत्राटी क्रीडा मार्गदर्शक म्हणुन सेवारत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कार्यक्रमाकरीता नगराच्या प्रथम नागरीक कु.रोजा करपेत नगराध्यक्षा, दिनकर खोत मुख्याधिकारी न.प. शैलेन्द्र पटवर्धन ऊपाध्यक्ष, प्रमोद पिल्लारे सर्व आदरणीय नगरसेवक व सर्व पत्रकार बंधु तथा सर्व नगरपंचायत अहेरी चे स्वच्छता आधारस्तंभ सफाईगार कर्मचारी ऊपस्थीत होते. सेन्साई रवि भांदककार यांनी या अभियानात पुर्णपणे सहभागी होऊन कार्य करण्याची हमी दिली. त्याचे सार्वत्रीक अभिनंदन करुन पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.