Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गावाच्या विकासासाठी आपले उत्तम योगदान द्या- कमांडंट खोब्रागडे

गरजूंना कपडे वितरण कार्यक्रम संपन्न

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी, 31 मार्च :- आपल्या गावाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतःचे श्रेष्ठ योगदान दिल्यास गावाचा विकास होण्यास कोणीही रोखू शकत नसल्याचे प्रतिपादन अबूझामड क्षेत्रातील लाहेरी गावात गावकऱ्यांना कपडे व इतर वस्तू वाटपाच्या कार्यक्रम प्रसंगी सीआरपीएफ च्या 37 बटालियनचे कमांडंट एम एच खोब्रागडे यांनी केले.

अतिदुर्गम नक्षलग्रस्त लाहेरी क्षेत्रामध्ये सीआरपीएफ 37 बटालियनचे पोलीस उपमहा निरीक्षक जगदीश मीना यांच्या मार्गदर्शनात प्राणहिता कॅम्पच्या 37 बटालियनचे कमांडंट एम एच खोब्रागडे यांच्या उपस्थितीत ग्रामीण भागातील गरजू व गरीब महिलांना साड्या, पुरुषांना कुर्ता व पायजमाचे वितरण करण्यात आले. यावेळी सहाय्यक कमांडंट अशोक टी., शीतला प्रसाद, उप पोलीस स्टेशन लाहेरीचे प्रभारी महादेव भालेराव उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एक गाव एक वाचनालय दिंडीने सुरुवात झालेल्या कार्यक्रमात ग्रामीण भागातील नागरिक, आशा वर्कर्स, शिक्षक, आरोग्य कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सिविक ॲक्शन प्रोग्राम अंतर्गत अहेरीच्या प्राणहिता 37 बटालियन सीआरपीएफ च्या कार्यक्रमाची नागरिकांनी, स्थानिक प्रशासनाने व संस्थांनी स्तुती केली. कार्यक्रमाला पोउनी संतोष काजले, उपपोलीस स्टेशन लाहेरीचे कर्मचारी. सीआरपीएफचे जवान व मोठ्या संख्येने लाभार्थी व नागरिक यावेळी उपस्थित होते.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.