Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कुमरगुडा येथे मधमाशा पालन प्रशिक्षण संपन्न

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 31 मार्च :- महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय गडचिरोली अंतर्गत २०२२-२३ मध्ये मधपाळ प्रशिक्षण मौज कुमरगुडा ता. भामरागड जिल्हा गडचिरोली येथे १० लाभार्थीस १० दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. सदरचे प्रशिक्षण दिनांक १५ ते २४ मार्च पर्यंत घेण्यात आले. कार्यक्रमाला स्वप्नील मगदूम संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती, भामरागड. अनमोल कांबळे तहसीलदार, भामरागड तसेच भास्कर मेश्राम, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, गडचिरोली व दत्तुभाऊ येरगुडे मधमाशा पालन प्रशिक्षक इत्यादी प्रमुख अथिती उपस्थित होते.

स्वप्नील मगदूम, संवर्ग विकास अधिकारी. यांनी अतिदुर्गम भागात कशाप्रकारे उद्योगाला चालना मिळेल या बद्दल सांगितली व  कांबळे साहेब तहसीलदार यांनी मधमाश्या पालनाचे फायदे व त्यापासून निर्माण होणारे रोजगार यांची माहिती दिली भास्कर मेश्राम जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी मंडळाचे विविध योजनाबद्दल माहिती दिली व प्रशिक्षक दत्तुभाऊ येरगुडे यांनी मधमाशा पालणा बद्दल माहिती दिली. तसेच खादी ग्रामोद्योग मंडळाचे इतर कर्मचारी लखन गेडाम, शैलेश गोतमारे व हर्षल हुमणे उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.