Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रवादीत वरिष्ठांना ‘या’ गोष्टी पुरविल्यास मिळते जिल्हाध्यक्ष पद.

जिल्हा सचिव राष्ट्रवादी महिला आघाडी ज्योत्स्ना पाटील यांचा गौप्यस्फोट.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सोलापूर, 24, सप्टेंबर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण यांच्या सूचनेनुसार सोलापूर नूतन महिला जिल्हाध्यक्ष पदी सुवर्णा शिवपूरे आणि महिला जिल्हा कार्याध्यक्ष पदी सुवर्णा झाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोघींना जिल्हाध्यक्ष बळीराम साठे व पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष श्रीमती कविताताई म्हेत्रे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

या निवडींवर राष्ट्रवादीच्या आजी व माझी महीला पदाधिकारी नाराज असल्याचे दिसून येत आहे. यातच राष्ट्रवादी जिल्हा सचिव जोत्सना पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे मोठा गौप्यस्फोट केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिव जोत्सना पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे वर्तमानपत्रातील बातमी पोस्ट करत, सोलापूर जिल्ह्यात जर जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्याध्यक्ष हे पद पाहिजे असेल तर पक्षाच काम करणाऱ्याला नाही मिळणार तर वरिष्ठाना 5 स्टार हॉटेल मध्ये राहण्याची सोय चमचमीत जेवणाची सोय. येण्या जाण्याचा गाडी खर्च आणि जाताना एखाद गिफ्ट हे सगळं केलं की दुसऱ्या दिवशी नियुक्ती पत्र हातात. असा गौप्यस्फोट केला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा सौ. सुप्रिया गुंड-पाटील यांनी सांगितले की, मला राजीनामा देणे बाबत कोणतीही सूचना दिली नाही. नवीन निवडी बद्दल देखील काम कळविले नाही. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी बद्दलची माहिती समाज माध्यमातूनच मिळाली. तसेच आपण याबाबत पक्षप्रमुख शरद पवार व खा. सुप्रिया सुळे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही सुप्रिया गुंड-पाटील यांनी सांगितले.

हे देखील वाचा :-

ग्रामपंचायत सचिवाची कर्तव्यावर गैरहजेरी ; गोंडवाना गोटूल सेनेची निवेदनातून तक्रार.

Comments are closed.