औरंगाबाद चे नामांतर संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावर शिवसेना भांडवल- आ. गोपीचंद पडळकर
विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना 29 जानेवारी :- औरंगाबाद की संभाजीनगर हा विषय अनेक वर्षांपासून चालू आहे हा राजकारणाचा विषय असू शकत नाही निवडणूका जवळ आल्याच्या नंतर तुम्हीच जर या विषयावर त्याच भांडवल करणार असाल तर हे चूकीचे आहे.असे ते शिवसेनेला उद्देशाशून म्हणाले.
आज शिवसेना राज्यकर्ते आहेत त्यांनी निर्णय करावा त्याच्यावर लोकांमध्ये चूकीचा संदेश पसरवून त्याच्यावर आंदोलन करायला लावून त्याच्यावर तुम्हीच म्हणजे शिवसेना बोलणार, आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, मग बोलता कशाला कराना,तुम्हीच आता प्रक्रीयेत आहात तुम्हालाच अधिकार आहे निर्णय करण ही राज्य सरकारची जवाबदारी आहे अस असताना नुसती स्टेटमेंट करण मिडीयामधून चर्चा घडवून आणन लोकांमध्ये वातावरण तयार करण यापेक्षा शिवसेनेने निर्णय करण गरजेचे आहे असे आ.पडळकर म्हणाले.
Comments are closed.