Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

घोट वनपरिक्षेत्र कार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

गडचिरोली, दि. २९: आलापल्ली वन विभागातील कार्यरत एका कर्मचाऱ्याकडून त्याचा प्रोत्साहन भत्ता मंजूर केल्याचा मोबदला म्हणून ३ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घोट येथील वनपरिक्षेत्र कार्यालयातील लिपिक हास्यवंदन बाळकृष्ण बाळेकरमरकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा वनविभागात कर्मचारी असून, घोट वनपरिक्षेत्र कार्यालयातील लिपिक हास्यवंदन बाळेकरमरकर याने त्याचा २०१६ पासूनचा प्रोत्साहन भत्ता काढून तो बँकेत जमा केला. याचा मोबदला म्हणून बाळेकरमरकर याने तक्रारकर्त्याला ३ हजार रुपयांची मागणी केली. मात्र, लाच देण्याची तक्रारकर्त्यांची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकार्यांनी आज सापळा रचला असता हास्यवंदन बाळेकरमरकर याने तक्रारकर्त्यास ३ हजार रुपयांची लाच मागितल्याचे पंचासमक्ष स्पष्ट झाले. त्यावरून हास्यवंदन बाळेकरमरकर याच्यावर चामोर्शी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या नेतृत्वात सहाय्यक फौजदार मोरश्वर लाकडे, हवालदार, नथ्थू धोटे, शिपाई सतीश कत्तीवर, महेश कुकुडकर, किशोर ठाकूर, गणेश वासेकर, घनश्याम वडेट्टीवार, सोनी तावाडे यांनी ही कारवाई केली.       

Comments are closed.