Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सामाजिक कार्यकर्त्या शाहीन हकीम यांची राष्ट्रवादी कॉग्रेस महिला गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती

ना. जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

अहेरी, दि. २९ जानेवारी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गडचिरोली महिला जिल्हा अध्यक्षपदी शाहीन हकीम यांची निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, आ. धर्मरावबाबा आत्राम यांची उपस्थित होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने अहेरी येथून काल राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. पक्ष संघटना व पक्ष बांधणी सोबत कार्यकर्त्यासोबत थेट संवाद साधण्यासाठी प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर अहेरीत आल्या होत्या. त्यामुळे शाहीन हकीम यांची गडचिरोली महिला जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने अहेरी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला वर्गावर लक्ष केंद्रित करीत आहे. या आधी शाहीन हकीम यांनी राष्ट्रवादी महिला कार्याध्यक्ष व चंद्रपूर जिल्हा निरीक्षक अश्या विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रात त्यांच्या नियुक्तीमुळे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments are closed.