अहेरीत शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात
अहेरी, दि. १९ फेब्रुवारी: अहेरीत शिवजन्मोत्सव सोहळा समिती तर्फे राजे विश्वेश्वराव चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णा कृती पुतळ्याला विधिवत पूजा व अभिषेक महाआरती करून हार अर्पण करण्यात आला. विशेष म्हणजे कोरोना काळात सोशल डिस्टनिंग चे पालन करून हा सोहळा साजरा करण्यात आला.
या वेळी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून माजी पालकमंत्री राजे अंबरीश राव,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सह-संघचालक गजानन राऊलवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते यावेळी उपस्थित शिवभक्तांना उद्बोधन करण्यात आले. पूर्णाकृती पुतळ्याला फुलाचा वर्षाव करून शिवभक्तांनी आदरांजली वाहिली. महाप्रसादाणे कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
Comments are closed.