Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! तलावात बुडून चिमुकल्या बहिण भावाचा मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

नागपूर : जिल्ह्यातील सावंगी देवळी येथील दोन चिमुकले बहीण, भाऊ गुमगाव रोड येथील तलावात बुडून मरण पावल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

हिंगणा ते कान्होलीबारा रोडवर १० किलोमिटर अंतरावर आमगाव देवळी येथे ही घटना घडल्याचे सोमवारी सकाळी निदर्शनास आले. आरुषी (१०) आणि अभिषेक (७) अशी या दोन भावंडांची नावे आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

देवळी सावंगी येथील नामदेव राऊत आणि त्यांची पत्नी दोघेही मोलमजुरी करून कुटुंबाला उदरनिर्वाह करतात. सुगीचे दिवस असल्याने नेहमी प्रमाणे ते दोघेही मजुरीच्या कामावर शेतात गेले. आरुषी आणि अभिषेक ही दोन्ही मुले घरीच होती. दुपारी ते खेळण्याच्या निमित्ताने नदीच्या काठावर गेले. तेव्हापासून हे दोघेही भावंडं बेपत्ता होती. सायंकाळ पाचच्या सुमारास आई कामावरून घरी परतली असता त्यांना दोन्ही मुले दिसली नाहीत. त्यांनी बरीच शोधाशोध केली. सायंकाळपर्यंत वाट पाहूनही झाली. तोवर पाऊसही आला. त्यामुळे मुले कोणाच्यातरी घरी असतील, असा विचार करून त्यांनी रात्र काढली. तरीही मुले सोमवारी सकाळपर्यंत परत न आल्याने नामदेव राऊत यांनी हिंगणा पोलिस ठाण्यात धाव घेतली.

तोवर नदीच्या काठावर मुलांचे कपडे आणि चपला दिसल्याचे गावातून एक जण सांगत आला. आई वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली असता ही आपल्याच मुलांचे कपडे असल्याचे त्यांनी ओळख पटविली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यानंतर नदी पात्रात शोध घेतला असता दुपारी दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले. खेळता खेळता मुलांचा खोल पाण्यात तोल गेला असावा, आणि त्यातच ते बुडून मरण पावले असावेत, अशी हळहळ व्यक्त केली जात आहे.

हिंगणा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जवळच्या रुग्णालयाकडे पाठविले आहेत.

हे देखील वाचा :

वाहणाऱ्या वृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ करण्यात मग्न; शेवटी नाल्यात वाहून दुर्दैवी मृत्यू

सोशल मिडीयावर व्हीडीओ व्हायरल करुन संपवली जीवन यात्रा

आर्टलाईनने ‘जिवंत’ ठेवली कलाकारांची हार्टलाईन

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.