Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मतदार नोंदणी, दावे व हरकती स्विकारण्याकरिता 29 व 30 जून रोजी विशेष शिबीर

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर, दि. २० : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांचे मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट करणे किंवा वगळणे, मतदार यादीत नाव तपासणी करणे, आवश्यक असल्यास दुरुस्ती करणे, स्थानांतरण करणे आदी करीता नागरिकांना  मतदारांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी २९ व ३० जून २०२४ रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

संपूर्ण जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदान केंद्र पर्यवेक्षक यांच्या उपस्थितीत वरीलप्रमाणे दावे व हरकती प्राप्त करून घेण्यासाठी २९ व ३० जून २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत विशेष शिबीर घेण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (राजूरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रम्हपूरी, चिमूर, वरोरा) यांना पत्राद्वारे सुचित केले आहे की, आपापल्या कार्यक्षेत्रात अधिनस्थ सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदान केंद्र पर्यवेक्षक यांना, नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर शिबिराच्या कालावधीत उपस्थित राहून दावे व हरकती प्राप्त करण्याबाबत निर्देशित करावे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच या विशेष शिबिरात नवमतदारांनी नाव नोंदणी, यादी तपासणी, आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.