Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जेष्ठ नागरिकांचे उत्स्फूर्तपणे मतदान

Get real time updates directly on you device, subscribe now.

विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, दि. १५ जानेवारी: जालना तालुक्यातील इंदेवाडी येथे सकाळ पासून ग्रामपंचायतच्या मतदानाला सुरुवात झाली, यावेळी नागरिक, जेष्ठ नागरिकांना उत्स्फुर्तपणे मतदान करीत आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जालना जिल्ह्यातील 446 ग्रामपंचायतीच्या 4154 जागांसाठी आज 1480 मतदान केंद्रांवर मतदान पार पडत आहे. जिल्ह्यातील 474 पैकी 28 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झालेल्या असल्यामुळे 446 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आज पार पडत आहेत. या 446 ग्रामपंचायतींच्या 4154 जागांचे भवितव्य आज मतदार ठरवणार आहेत.

जालना तालुक्यातील 4 ग्रामपंचायती अगोदरच बिनविरोध निवडून आल्याने 81 ग्रामपंचायतींच्या 731 जागांसाठी 261 मतदानकेंद्रांवर आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे. यासाठी 1800 कर्मचारी आणि 450 पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आज सकाळी जालना तालुक्यात शांततेत मतदानाला सुरुवात झाली असून मतदार केंद्रांवर येवून आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.