Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसे ईडी समोर चौकशीसाठी हजर राहणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. १५ जानेवारी:  राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आज ईडी समोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत. भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणी ईडीनं याआधी 30 डिसेंबर रोजी एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केलं होतं. पण कोरोनाची बाधा झाल्यामुळे एकनाथ खडसे त्यावेळी चौकशीसाठी हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे आज ते ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी दिली आहे.

एकनाथ खडसे यांचा क्वॉरंटाईन काळ संपल्याने आज एकनाथ खडसे ईडी चौकशी करता हजर राहणार असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते यांनी  प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.  

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पुण्यात भोसरी जमीन  घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावले आहे. 30 डिसेंबर 2020 रोजी खडसेंना हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, समन्स मिळाल्यावर खडसे जळगावहून मुंबईला आले, पण त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाल्याने क्वॉरंटाईन व्हावे लागले होते. क्वॉरंटाईन पिरिअड संपल्यावर खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार आहेत. जमीन व्यवहार या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना 2016 मध्ये आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Comments are closed.