Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जि. प. सदस्य ऋषि पोरतेट यांच्या चारचाकी वाहनाची अज्ञात्यांनी केली जाळपोळ

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • जि. प. सदस्य ऋषी पोरतेट यांचे वाहन जाळून लाल अक्षरात लिहीलेली पत्रके टाकल्याने तर्क वितर्कांना आले उधाण
  • पत्रकामध्ये  माओवादी पार्टी आ. धर्मरावबाबा आत्राम, ऋषी दादा पोरतेट मुर्दाबाद लिहून सत्ताधार्‍या च्या केला विरोध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली, दि. 14 जानेवारी: अहेरी तालुक्यातील देचलीपेठा येथील जीप सदस्य ऋषी पोरतेट यांच्या मालकीच्या बोलेरो गाडीची 14 जानेवारीच्या पहाटे च्या सुमारास त्यांच्या घरासमोर अज्ञात इसमाकडून जाळपोळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सोबतच या ठिकाणी लाल अक्षरात लिहीलेली पत्रके टाकली असल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य ऋषी पोरतेट हे देचली पेठा ह्या आपल्या मूळ गावी रात्रीच्या सुमारास ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार आटोपून आल्यावर झोपी गेले होते.

पहाटेच्या दोन अडीचच्या सुमारास त्यांच्या मालकीच्या बोलेरो गाडीला आग लागल्याचे लक्षात आले.  लागलीच पोरतेट व त्यांच्या कुटूंबियांनी गाडीला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला आग विझवेपर्यत गाडीची वायरिंग इंजिन व टायर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.त्यामुळे गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सोबतच या ठिकाणी  मिळालेल्या  पत्रकामध्ये  माओवादी पार्टी धर्मरावबाबा आत्राम, ऋषि दादा पोरतेट मुर्दाबाद सभी ग्रामपंचायत में इनका सत्ता नही चलना चाहीये लाल सलाम अश्या आशयाचा मजकूर लाल शाईने हिंदी भाषेत लिहीलेला आढळला आहे.  

सदर जाळपोळीची तक्रार जि.प. सदस्य पोरतेट यांनी देचलिपेठा उप पोलीस ठाण्यात केली आहे.

ग्रामपंचायत निवडणूकीची धामधूम सुरू असताना जिल्हा परिषद सदस्याच्या चारचाकी वाहनाची जाळपोळ करण्यात आल्याने या मागे नक्की कुणाचा हात आहे हे पोलिस तपासा अंती स्पष्ट होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.