Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विचारज्योत फाऊंडेशन, चंद्रपुर तर्फे राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन…

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपुर,19, सप्टेंबर :- विचारज्योत फाऊंडेशन, चंद्रपुर तर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य राज्यस्तरीय ऑनलाइन निबंध लेखन स्पर्धा-२०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. या निबंध स्पर्धेसाठी लोकशाहीच्या नजरेतून अमृत महोत्सवाचे रंग, रक्षा तुझी नी माझी हे संविधान करते, वर्तमान राजकीय स्थिती आणि देशाचे भविष्य, राष्ट्रउभारणीमध्ये युवकांचे योगदान आणि आधुनिक पिढीला सोसेना सोशल मीडिया असे एकूण पाच विषय ठेवण्यात आले आहेत.

निबंध स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि एकूण पाच प्रोत्साहनपर अनुक्रमे २०००/- रुपये रोख, १५००/- रुपये रोख, १०००/- रुपये रोख आणि ५००/- रुपये रोख असे बक्षीस देण्यात आले आहे. सोबतच सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथ असे बक्षिसाचे स्वरूप असेल. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेविषयी अधिक माहिती करिता विचारज्योत फाऊंडेशनचे सुरज पी दहागावकर (८६९८६१५८४८, ९९६००२०७६२), मुन्ना तावाडे (७६६६२९९०४५) आणि दिनेश मंडपे (८९९९५५८७४५) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुल येथे होणाऱ्या सुरजागड लोह प्रकल्पाच्या मालधक्क्याला स्थानिकांचा प्रचंड विरोध.

धक्कादायक! आईने आपल्या 13 वर्षीय मुलीला परपुरुषाशी ठेवायला लावले शरीरसंबंध

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.