Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हा स्थानिक तक्रार निवारण समितीत अध्यक्ष व अशासकीय सदस्यासाठी निवेदन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 28 मे: कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम-2013 व नियम दिनांक 09 डिसेंबर 2013 अंतर्गत जिल्हा स्तरावर स्थानिक तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येणार आहे. सदर जिल्हा स्तरीय स्थानिक तक्रार समितीची रचना पुढीलप्रमाणे राहिल.

अ) अध्यक्ष– सामाजिक कार्याचा 5 वर्षाचा अनुभव असलेल्या आणि महिलांच्या सोयीसाठी बांधिल असलेल्या महिलांमधून नामनिर्देशनाने अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येईल. ब) दोन सदस्य-  महिलांच्या सोयीसाठी बांधिल असलेल्या अशा अशासकीय संघटना/संघ किंवा लैंगिक छळाच्या प्रश्नांशी परिचित असलेली व्यक्ती यामधून दोन सदस्य नामनिर्देशित करण्यात येईल व त्याच्यापैकी किमान एका महिला सदस्याची निवड करण्यात येईल. परंतु, त्यापैकी किमान एका नामनिर्देशित सदस्याची पार्श्वभुमी प्राधान्यांने कायद्याची (Legal) असावी तसेच त्यापैकी किमान एक नामनिर्देशित सदस्य अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती  किंवा इतर मागासवर्ग अल्पसंख्यांक समाजातील महिला असावी.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वरील प्रमाणे जिल्हा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष व अशासकीय सदस्य म्हणून काम करण्यास इच्छुक अर्हताधारक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे परिपुर्ण माहितीसह प्रस्ताव (दोन प्रतीत) जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचेकडे बातमी प्रसिद्ध झाल्याच्या 15 दिवसाच्या आत सादर करावे असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

खाजगी कोविड रूग्णालयातील उपचाराबाबतच्या देयकांचे होणार लेखापरिक्षण

(DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

बुरशीजन्य आजार… म्युकरमायकोसीस!

Comments are closed.