Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सामाजिक ऐक्याचे प्रेरणास्तोत – केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

औरंगाबाद ,२२ फेब्रुवारी: आम्ही उद्धव ठाकरे सोबत असताना शिवसेना नेते संदिपान भुमरे यांच्यासोबत चांगले संबंध होते, आजही आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढ जवळ आलो आहे की भाजपवाले म्हणतील एवढ जवळ का गेलात ? अशी मिश्किल टिप्पणी केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटी दरम्यान शिव शक्ती व भीम शक्ती एकत्रित आली पाहिजे अस त्यांनी सांगितले व आम्ही एकत्रित आलो. आज उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते तर आम्हाला आनंद झाला असता पण त्यांना ५ वर्षे मिळाली असल्याने ते आताच येणार नाही, पुढे येतील अशी टिप्पणी रामदास आठवले यांनी केली.

केंद्र सरकारच्या विविध लोकापयोगी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन याप्रसंगी रामदास आठवले यांनी केले. केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील सर्वणांना आरक्षण दिले तसेच राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका सर्वप्रथम मी मांडली होती असा दावा रामदास आठवले यांनी केला. मात्र सरसकट आरक्षण न देता ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मराठा समाजातील लोकांना आरक्षण द्यावे असेही मी सांगितले होते. एके काळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध असायचा मात्र आज त्यांचा पुतळा बसविण्यास सर्वच समाजातील लोक एकत्रित येत आहे, सर्व गावकरी एकत्र येत आहे हा बाबासाहेबांच्या घटनेचा विजय आहे, असे कौतुक रामदास आठवले यांनी या प्रसंगी केले. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे तसेच तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे अनावरण आज केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले व महाराष्ट्राचे फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने हे दोन्ही नेते व्यासपीठावर एकत्रित आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

आयुर्वेदाला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी आयुर्वेद संस्था, चिकित्सकांनी संकल्प करावा: राज्यपाल

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

 

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र,नागपूर नियामक मंडळावर महाराष्ट्रातून आनंद कसंबे

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.