Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र,नागपूर नियामक मंडळावर महाराष्ट्रातून आनंद कसंबे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

यवतमाळ:22फेब्रुवारी, केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालय अंतर्गत येत असलेल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या नियामक मंडळावर यवतमाळातील आनंद कसंबे यांची नेमणूक झाली आहे. केंद्र सरकारच्या वतीने झालेल्या या नेमणुकीमध्ये महाराष्ट्रातील ते एकमेव व्यक्ती आहेत. त्यांच्याशिवाय मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा व आंध्रप्रदेश या राज्यातूनही प्रत्येकी एका जणाची निवड या मंडळावर करण्यात आली आहे.

आनंद कसंबे हे लोककलेचे अभ्यासक म्हणून विख्यात आहेत. त्यांची ‘शोध भाकरीचा’  ही मालिका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रदर्शित झाली आहे. महाराष्ट्र टाईम्स मधूनही त्यांची ही लेखमाला प्रसिद्ध झाली आहे. लोककलावंतांचा संघर्ष रुपेरी पडद्यावर आणण्यासाठी त्यांचा चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. चित्रकार, व्यंगचित्रकार, दूरदर्शन प्रतिनिधी म्हणून विख्यात असणारे आनंद कसंबे संस्कार भारती विदर्भ प्रांताच्या लोककला विधेचे संयोजक आहेत. त्यांच्या पुढाकाराने लोक कलेचे विविध कार्यक्रम आयोजित झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक समितीवरही यापूर्वी ते होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आनंद कसंबे यांनी त्यांच्या या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला असून दुर्मिळ होत चाललेल्या लोककलांना आपल्या निवडीमुळे संजीवनी मिळेल व एकूणच कला प्रांताच्या विकासात आपण मोलाचे योगदान देऊ शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कसंबे यांच्या निवडीबद्दल त्यांचे केंद्र संचालक दीपक खिरवडकर, संस्कार भारतीच्या प्रांताध्यक्ष डाॅ. कमल भोंडे, आशुतोष अडोणी, विवेक कवठेकर यांच्यासह कलाप्रांतातून अभिनंदन होत आहे

Comments are closed.