Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यात सर्वत्र हूडहुडी ! येत्या दोन दिवसात थंडीची जोरदार लाट

Get real time updates directly on you device, subscribe now.

महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे  नोंदण्यात आले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, २१ डिसेंबर: राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा घसरल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे  नोंदण्यात आले. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान परभणीत 5.6 अंश सेल्सिअस, निफाडमध्ये यंदाच्या मौसमातील सर्वात कमी 8.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय तर गोंदिया येथे 7.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

उत्तर भारतात पुढील दोन दिवसांत थंडीची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरण्याची शक्‍यता आहे. तसेच, विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्‍यताही वर्तविण्यात आली आहे. 

राज्यात येत्या दोन ते तीन दिवस राज्यातही काही भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात हवामान कोरडे आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढली आहे. यामुळे किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. विदर्भातील काही भागांत कडाक्याची थंडी आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोरडे हवामान आणि उत्तर भारतातून शीतलहरी या महाराष्ट्राच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजपासून राज्यात कडाक्याची थंडी असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढणार आहे. यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.