अवकाशात 20 वर्षांनी एकत्र आलेले शनी आणि गुरू ग्रहाचे वाशिमकरांनी घेतले दर्शन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वाशीम, २१ डिसेंबर: अवकाशात सध्या एक अविस्मरणीय घटना घडत आहे. शनी आणि गुरू काल संध्याकाळच्या सुमारास दोन्ही ग्रह 20 वर्षांनी जवळ आले होते. ते सूर्यास्तानंतर तासभर पश्चिमेस नुसत्या डोळ्यांनी दिसत होते. हीच अविस्मरणीय घटना आपल्या दुर्बिणीतून दाखवण्याचा प्रयत्न वाशिम येथील खगोल प्रेमी विशाल दवंडे या तरुणाने केला असून ते पाहण्यासाठी बरीच मंडळी त्याच्याकडे येत होते. तर आज 21 डिसेंबर रोजी शनी-मंगळ आणि गुरू या तिन्ही ग्रहाची युती होणार आहे. ही घटना 800 वर्षातून एकदा होणारी आहे. ही घटना खगोल प्रेमींना दाखवण्याचा प्रयत्न विशाल करीत आहे.
Comments are closed.