Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लाहेरी शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा; ५८ विद्यार्थ्यांवर उपचार, दोघांची प्रकृती चिंताजनक

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणाऱ्या शासकीय आश्रमशाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या अंदाजे ५८ ते ६० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवार, २८ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. उलटी, मळमळ व पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्राप्त अधिकृत माहितीनुसार, लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या २० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून भामरागड तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालयात ३८ विद्यार्थ्यांवर वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. यापैकी कमलेश इरपा पुंगाटी (वय १४) आणि चंदा बिच्चू मट्टामी (वय १४) या दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक वाटल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय भामरागड येथून उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे हलविण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी अमर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किशोर बागडे यांनी ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे भेट देऊन दाखल विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची पाहणी केली तसेच वैद्यकीय यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या. यासोबतच त्यांनी शासकीय आश्रमशाळा लाहेरी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरी येथे भेट देऊन बाधित विद्यार्थ्यांच्या उपचारांचा आढावा घेतला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि भामरागड ग्रामीण रुग्णालयात तातडीने नियुक्त करण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, ही विषबाधा अन्नातून झाली की अन्य कारणामुळे, याबाबत चौकशी सुरू असून तपासानंतरच नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.