Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अभ्यासिकेत अभ्यास करत असतानाच विद्यार्थीनींचा आकस्मिक मृत्यु .

हृदयद्रावक घटना: हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती .

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पुणे, 30, सप्टेंबर :- अभ्यासिकेत अभ्यास करत असताना पूजा राठोड या विध्यार्थीनीला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना अभ्यासिकेतील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.  काल पूजा राठोड हिच्यावर तिचं मूळ गाव कोंडी तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
पूजा स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती.

हा मृत्यू झाल्याची घटना वडगाव शेरी येथे घडली. ह्रदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वैद्यकतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पूजा वसंत राठोड (वय २५) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पूजा मूळची सोलापूर जिल्ह्यातील कोंडी तांडा या गावातील आहे. ती एका कंपनीत नोकरी सांभाळून स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होती. आपल्या बहिणीसोबत ती पुण्यात राहत होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मंगळवारी पुजा स्टडी सेंटरच्या अभ्यासिकेत अभ्यास करीत बसली होती. अचानक तिला हृदयविकाराचा झटका आला आणि ती जागेवरच कोसळली. यानंतर काही विद्यार्थ्यांनी तिला रुग्णालयात जाखल केलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आई सप्तश्रृंगी मातेचे साधारण एक हजार वर्षापूर्वीचे मूळ स्वरूपाचे दर्शन ….

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.