Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आयआयटी खरगपूर मधील दलित विद्यार्थ्यांना जातीवाचक अपशब्द वापरणाऱ्या प्राध्यापिकेवर कारवाई करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २७ एप्रिल:  आयआयटी खरगपूर  हे उच्च शिक्षणासाठी देशात नावाजलेले विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठाच्या प्राध्यापिका सीमा सिंग यांनी दलित आदिवासी विद्यार्थ्यांना जातीवाचक अपशब्द काढून सर्व दलित आदिवासींचा अवमान केला आहे. त्यांच्यावर ऍट्रोसिटी ऍक्ट नुसार कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे. त्याबाबत  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना  खरगपूर विद्यापीठाचे कुलगुरू आणि खरगपूरचे पोलीस अधीक्षकांना ना रामदास आठवले यांनी पत्र पाठविले आहे.

खरगपूर विद्यापीठाच्या आय आय टी च्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन लेक्चर सुरू असतांना राष्ट्रगीताची घोषणा झाली त्यावेळी यातील काही दलित आदिवासी विद्यार्थी राष्ट्रगीतावेळी उभे राहिले नाही. तसेच भारतमाता की जय म्हणाले नाहीत त्यामुळे प्रा. सीमा सिंग रागावल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रगीतावेळी उभे राहिलेच पाहिजे तसेच प्रत्येक भारतीयाने भारतमाता की जय म्हंटलेच पाहिजे. तसे जर या दलित आदिवासी विद्यार्थ्यांनी केले नसेल तर ती त्यांची चूक आहे. मात्र ऑनलाईन वर्ग सुरू असतांना या दलित आदीवासी विद्यार्थ्यांना राष्ट्रगीतावेळी उभे राहण्याबाबत समजले नसेल. पण राष्ट्रगीतावेळी ते उभे राहिले नाही ही या दलित आदिवासी विद्यार्थ्यांची चूक आहे. मात्र या चुकीवरून संबंधित प्राध्यापिका सीमा सिंग यांनी दलित आदिवासींच्या मातापित्यांना बास्टर्ड असे अपशब्द वापरणे; जातीवाचक शिवीगाळ करणे निषेधार्ह आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भारतीय संविधानाने जातीभेद नष्ट केला आहे. जातीयद्वेषातून प्रा. सीमा सिंग यांनी दलित आदिवासी विद्यार्थ्यांना केलेल्या शिवीगाळ प्रकरणी ऍट्रोसिटी ऍक्ट नुसार कारवाई झाली पाहिजे अशी आपली मागणी असल्याचे ना. रामदास आठवले यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.