Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पगार देत नसाल, तर आम्हाला विष द्या

– कंत्राटी कामगारांकडून मंत्री अमित देशमुखांसमोर सरकारचा निषेध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. २७ एप्रिल: जिल्हा शासकीय रुग्णालयातील कंत्राटी महिला कामगारांनी राज्याचे वैद्यकीय मंत्री अमित देशमुख व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासमोरच, आमचा सहा महिन्याचा थकीत पगार देत नसाल तर आम्हाला विष द्या, या शब्दात सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरोना योध्दा म्हणून कार्यरत येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय कामगारांना मागील सहा महिन्यापासून वेतन मिळाले नाही. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या वैद्यकीय कामगारांनी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात मागील ७८ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डेरा आंदोलन सुरू केले. मात्र, अद्याप त्यांचा प्रश्न सुटलेला नाही.

दरम्यान, मंगळवारी अमित देशमुख हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असता, ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पत्रकारांशी संवाद साधत असताना दोन वैद्यकीय महिला कामगार तेथे आल्या. त्यांनी अमित देशमुख व विजय वडेट्टीवार यांच्याकडे आपल्या समस्या मांडत संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच सरकार आमच्या मागण्या पूर्ण करीत नसेल तर आम्ही काय करावे, असा प्रश्‍न उपस्थित करीत सरकारचा निषेध नोंदविला. त्यानंतर नियोजन भवनाच्या समोर एकत्र झालेल्या डेरा आंदोलनातील वैद्यकीय महिला कामगारांनी सरकार विरोधात जोरदार नारेबाजी करीत निषेध नोंदविला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.