Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सणासुदीच्या काळात भेसळखोरांवर कडक कारवाई करा : डॉ. राजेंद्र शिंगणे

आकस्मिक भेटी व धाडी वाढवा, भेसळ नियंत्रण, ऑक्सीजन व औषधांची उपलब्धता हेच उद्दिष्ट ठेवण्याचे निर्देश.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर डेस्क, दि. १३ सप्टेंबर :  दूध, तेल, मिठाई व अन्य खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणारे हे असामाजिक तत्वच आहेत. त्यामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिले. कोरोनाच्या संभाव्य लाटेसाठी ऑक्सीजन व औषधांची उपलब्धता याकडेही लक्ष वेधण्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज नागपूर येथे अन्न व औषध विभागाच्या नागपूर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी सणासुदीमध्ये नागरिकांच्या आरोग्याची काळजी अन्न व औषधी विभागाने घ्यावी. या विभागाचे या काळातील हे सर्वात मोठे दायित्व असून भेसळ करणारे पकडल्या गेले पाहिजे. त्यामुळे नागरिकांकडून आलेल्या तक्रारी, खबरीकडून मिळालेल्या माहितीचा आधार घेत अशा असामाजिक तत्त्वांवर अंकुश लावणे, विभागाचे काम आहे. नागपूर विभागात अशा प्रकारच्या कारवाईची संख्या वाढणे आवश्यक असून त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी पुढील महिन्याचे नियोजन करण्याचे निर्देश आढावा बैठकीत दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यासोबतच नागपूर विभागात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती हे लक्षात घेऊन ऑक्‍सिजनचा साठा व त्याचा सुलभ, सहज नियमित पुरवठा याकडे लक्ष वेधण्याचे सांगितले. ऑक्सीजनचा साठा व त्यासाठी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा बाबतही त्यांनी माहिती घेतली.

राज्य शासनाने या संदर्भात साठवणुकीचे सूत्र ठरविले असून त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात साठा झाला पाहिजे. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने हे कार्य करण्याचे त्यांनी सांगितले. बेकायदा रेमडिसीवीर इंजेक्शन विक्री व साठा पकडून नागपुरात कोरोना लाटेदरम्यान कारवाई करण्यात आली. अशा धडक कारवाईचे प्रमाण विभागातील अन्य जिल्ह्यांमध्ये देखील वाढणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

वाघाला जेरबंद करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी वनाधिकार्याना खा.अशोक नेते यांचे निर्देश

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.