Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघाला जेरबंद करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी वनाधिकार्याना खा.अशोक नेते यांचे निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि,१३सप्टेंबर : तालुक्यात जेप्रा परिसरात वाघाने प्रचंड दहशत पसरवली असून दि ११ सप्टेंबर रोजी वाघाने हल्ला करून जेप्रा येथील गणपत मंगरू भांडेकर या शेतकऱ्यांला ठार केले. ही गंभीर बाब असून सदर नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश खा. अशोक नेते यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

आज दि १३ सप्टेंबर रोजी खा.अशोक नेते यांनी जेप्रा येथे जाऊन ग्राम पंचायत कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली व सदर नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याचे निर्देश दिले. तसेच भांडेकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले व ५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी खा. अशोक नेते , पं स चे उपसभापती विलासराव दशमुखे, गडचिरोली चे वनसंरक्षक डॉ किशोर मानकर, सहाय्यक वनसंरक्षक मनोज चव्हाण, मनोहर पाटील झंझाड, जेप्राच्या सरपंच शशिकला मनोहर झंझाड, उपसरपंच कुंदा राजेंद्र लोनबले, भाजपचे कार्यकर्ते देवानंद चलाख, व गावातील नागरिक उपस्थित होते.

खा. नेते यांना गावातील भेट दिली असता नागरिकांनी सांगितले की, सदर वाघाच्या भीतीमुळे शेतकरी भयभीत झाले असून शेताकडे जानेही कठीण झाले आहे. वाघ शेताकडे येत जात असून गाय- बकऱ्यांना सोडून तो मानवावर हल्ला करीत असल्याने  नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी खा.नेते यांच्याकडे करण्यात आली .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

हुतात्मा स्मारक हे वन शहिदांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे – खा. अशोक नेते यांचे प्रतिपादन

Comments are closed.