Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हुतात्मा स्मारक हे वन शहिदांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे – खा. अशोक नेते यांचे प्रतिपादन

वनसंपदा ईमारत आलापल्लीच्या प्रांगणात राष्ट्रीय वन हुतात्मा स्मारक उद्घाटन सोहळा संपन्न.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वनाचे रक्षण करतांना गस्तीवर असतांना वन्यप्राण्याची शिकार, वनातील विविध जातीचे झाडाची तस्करी तसेच इतर वनसंपदेचे तस्करी करतांना कर्मचाऱ्यांना आपल्या जीवास मुकावे लागले आहे. त्यामुळे त्यांची आठवण स्मरणात राहण्यासाठी आलापल्ली येथे वन कर्मचाऱ्याचे शहीद स्मारक उभारण्यात आले  असून या स्मारकावर ८ शहीद झालेल्या वन कर्मचाऱ्यांचे नावे सोनेरी अक्षरात कोरली आहेत. यामध्ये ६ लोकांना वनतस्करांनी ठार केले. तर दोन कर्मचाऱ्यांना नक्षल्यांकडून गळा चिरून ठार करण्यात आले. या आठही लोकांचे नाव शहीद स्मारकात जतन केले आहे. त्यामुळे शहीद वनकर्मचाऱ्यांची आठवण आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना शहीद वन कर्मचाऱ्यांचे  कर्तृत्वाची जाणीव उजाळा देण्यास वन कर्मचाऱ्यांसाठी यादगार ठरणार आहे.

आलापल्ली, दि. ११ सप्टेंबर :  वन कर्मचारी कर्तव्यावर असतांना तस्कराकडून तर कधी नक्षल्यांकडून ठार करण्यात आले आहेत. अशा शहीद वन कर्मचाऱ्यांची आठवण सदैव स्मरणात राहण्यासाठी आलापल्ली, भामरागड व सिरोंचा वन विभागाच्या सयुंक्त विद्यमाने नऊवा राष्ट्रीय वन हुतात्मा दिनाचे औचित्य साधून वनसंपदा ईमारत आलापल्लीच्या प्रांगणात नव्याने उभारलेल्या वन हुतात्मा स्मारकाचे उद्घाटन करून पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली’

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राष्ट्रीय वन हुतात्मा स्मारकाचे खा.अशोक नेते यांच्या शुभहस्ते शाही थाटात व विधिवत उदघाटन करण्यात आले, तदनंतर मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.  या  कार्यक्रमात वनाधिकारी, वनकर्मचारी, वनप्रेमी, वनसेवेत कार्यरत असतांना जीव गमावलेल्या परिवारातील सदस्य, प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम. श्रीनिवासराव अपर प्रधान वनसरंक्षक नागपूर, कार्यक्रमाचे उद्घाटक खा. अशोक नेते, गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्र, विशेष अतिथी अजय कंकडालवार, जि.प. अध्यक्ष गडचिरोली, आ. धर्मरावबाबा आत्राम, अहेरी विधानसभा क्षेत्र, प्रमुख अतिथी डॉ. किशोर मानकर, वनसंरक्षक गडचिरोली, सी. आर. तांबे, उपवनसंरक्षक आलापल्ली, सुमित कुमार, उपवनसंरक्षक सिरोंचा, आशिष पांडे, उपवनसंरक्षक भामरागड, राहुल सिंह टोलीया, वनाधिकारी (वन्यजीव) आलापल्ली,शंकर मेश्राम सरपंचसह आदी अधिकारी, कर्मचारी मान्यवर उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी खा. अशोक नेते यांनी वनाचे रक्षण करतांना शहीद झालेल्या वन शहिदांना न्याय देण्यात यावा. ज्या प्रमाणे सीमेवर जवान लढतात आणि पोलीस जवान देशाचे रक्षण करतात. त्याचप्रमाणे वनकर्मचारी हे वनाचे रक्षण करून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करतात. वनाचे रक्षण करून कित्येक लोकांचे प्राण वाचविन्याचे काम करतात. तर दुसरीकडे आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी जंगलात काम करत असतांना शहीद झालेल्या वन कर्मचार्यांना शासनाने पोलिसाच्या धरतीवर शहीद वनकर्मचाऱ्यांना १५ लाखांची मदत शासनाने द्यावी. यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन केले.

त्यानंतर बोलतांना जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार म्हणाले वनाचे रक्षण करतांना शहीद झालेल्या वन शहीदांच्या परिवारासाठी राखीव निधी ठेवणे गरजेचे आहे. त्यासोबतच वन विभागाच्या रोपवाटीकेला शहिदांचे नावे देण्यात यावे अशी मागणी केली.

कार्यक्रमात बोलताना  गडचिरोलीचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी म्हणाले की,वन कर्मचारी हे सदैव जोखीम पत्करून वनाचे रक्षण करतात. जल, जंगल, जमीन याची रक्षण करतात. वनांचे रक्षण करतांना अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ आलापल्ली, भामरागड, सिरोंचा वन विभागातील कर्मचाऱ्यांनी वर्गणी गोळा करून शहीद स्मारक उभारले आहे. यामुळे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.तर शेवटचा टप्पा प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर एम. श्रीनिवासराव यांनी  मार्गदर्शन करून पूर्ण केले.

या कार्यक्रमाप्रसंगी वन कर्मचारी संतोष पडालवार, हरिष दहागावकर आणि वर्सल खान यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर आलेल्या  मान्यवरांच्या हस्ते गडचिरोली वनवृत्त अंतर्गत वनांचे रक्षण करताना वीर मरण प्राप्त झालेले वन शहीद बी.आर पहाडे,जी.एन पाटील, आर.एस. पेडीचर्ला,ए.आर.अर्का,एम.सी. मेकला,जि.व्ही. दुर्गे ,जे.आर.कुंजाम या वन हुतात्मा परिवारातील सदस्यांना शालू साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला.

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर आनकरी यांनी तर सूत्रसंचालन पूर्वाताई दोंतूलवार यांनी केले.  उपस्थितांचे आभार उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वन कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

हे देखील वाचा 

जेप्रा येथे वाघाच्या हल्यात एक इसम ठार

वीज पडून १०० ते ११० शेळ्या व मेंढ्या जागीच ठार,पांच ते सहा लाखांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज

साकिनाका येथील महिलेच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपीना फाशीची शिक्षा द्या – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

 

 

Comments are closed.