Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वीज पडून १०० ते ११० शेळ्या व मेंढ्या जागीच ठार,पांच ते सहा लाखांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गड़चिरोली दी,१० सेप्टेंबर :- कोरची मुख्यालयापासून सुमारे १२ किमी,अंतरावर असलेल्या मसेली नजीक सावलीच्या जंगलात राजस्थान येथील मेंढपाळ शेळ्या व मेंढ्यांचे कळप घेऊन आले होते. काल दी, ०९ सप्टेबर रात्री सुमारे ११:०० च्या सुमारास मेघ गर्जनासह मुसलदार पाऊस सुरु असताना वीज पडून सुमारे १००ते ते ११० शेळ्या व मेंढ्या जागीच ठार झाले.

या घटनेमुळे सदर मेंढपाळांचा पाच ते सहा लाख रुपयाचा नुकसान झालला असल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे.

कोरची तालुक्यात दरवर्षी राजस्थान व गुजरात येथून हे मेंढपाळ शेळ्या व मेंढ्या चारण्यासाठी येत असतात. यावर्षी सुद्धा तालुक्यात यांचे दोन डेरे (कुटुम्ब )आलेले आहेत. त्यांपैकी एक डेरा बेळगाव परिसरात व दुसरा डेरा सावली परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यामध्ये ७ ते ८ परिवारांचा समावेश असून ते १००० च्या जवळपास जनावरे घेऊन आपला प्रवास करीत असतात.
०९ सप्टेंबर च्या रात्री दहा ते अकराच्या सुमारास या परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस येऊ लागला व यांच्या डेरे जवळच १०० ते ११० शेळ्या व मेंढ्या असल्या ठिकाणी अचानक वीज पडल्यामुळे ते जनावर जागीच ठार झाले. यात कोणत्याही इसमाला इजा झाली नसून सर्व परिवार सुखरूप आहेत

या घटनेची माहिती प्राप्त होतात कोरची येथील तहसीलदार छगनलाल भंडारी यांनी २ते ३ किलोमीटर पायी चालून घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. सदर घटना घडल्यानंतर त्या डेरेवाल्यांनी आपला डेरा त्या जागेवरून दुसर्‍या जागी हलविल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.