Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नायगावमध्ये अल्पवयीन तरुणीचा बॅग मध्ये सापडला मृतदेह

स्टेशन परिसरातील रस्त्याकडेच्या झाडीत सापडला मृतदेह

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वसई 27 ऑगस्ट :-  वसईच्या नायगाव पूर्व रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका बॅगमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याची घटना काल उघडकीस आली . नायगाव पूर्वच्या परेरा नगर ते नायगाव रेल्वे स्थानक रस्त्याच्या कडेला खारफुटी झाडांमध्ये एक संशयित बॅग येथील स्थानिकांना दिसून आली होती. याबाबत पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी या ठिकाणी तपासणी केली. त्यावेळी बॅगेमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. या मुलीच्या पोटावर धारधार वस्तूने हल्ला केल्याच्या खुणा पोलिसांना दिसून आल्या आहेत.
या प्रकरणी वालिव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. मृतदेहाच्या स्थितीवरून नुकताच हत्या केल्याचा संशय पोलिसांना असून तिच्या शाळेच्या गणवेशा वरून मुलीचे नाव निष्पन्न झाले आहे, सदर मुलीची अंधेरी पोलीस ठाण्यात मिसिंग ची तक्रार दाखल करण्यात आली होती,या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे.
शाळकरी मुलीच्या हत्येमुळे एकच खळबळ माजली आहे. अंधेरीतून अपहरण झालेल्या मुलीचा वसईत मृतदेह सापडला आहे. मुलीचे अपहरण कुणी केले आणि हत्या कोणत्या कारणासाठी केली याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे. तसेच आरोपींच्या शोधासाठी वसईतील वालीव पोलिसांचे स्वतंत्र पथक रवाना झाले आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश बर्वे यांनी सांगितले.

हे देखील वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.