Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्ह्यात हृदयद्रावक घटना

भावंडाना वाचवताना बहीण वाहून गेली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर  27 ऑगस्ट :-  चंद्रपूर जिल्ह्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना पुढे येत आहे. येथे आपल्या भावंडाना वाचवायला गेलेली बहीण कालव्यात वाहून गेली आहे. सध्या या अल्पवयीन मुलीचा शोध सुरु आहे. या घटनेत बुडणाऱ्या चार मुलांना वाचवण्यात यश आलं आहे. मात्र, यांना वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारी मात्र अद्याप बेपत्ता आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली शहरातून गेलेल्या आसोला मेंढा कालव्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका आईसोबत पाच मुलंही गेली होती. यापैकी चार मुलं ही कालव्यात आंघोळ करत होती. खोल पाण्यात गेल्याने ही मुलं बुडू लागली. रोहित अनिल मेडपल्लीवार (वर्ग ७), अमित अनिल मेडपल्लीवार (वर्ग ५), राहुल अंकुश मक्केवार (वर्ग ४), सुश्मिता अंकुश मक्केवार (वर्ग ८) ही मुले बुडू लागली. या बालकांना वाचविण्यासाठी त्यांच्या पाचव्या वर्गात शिकणाऱ्या काजल मक्केवार या धाडसी बहिणीने आपल्या जीवाची पर्वा न करता थेट कालव्यात उडी घेतली. मात्र काजल मक्केवार ही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.