Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

….बंद कारने घेतला अचानक पेट

Get real time updates directly on you device, subscribe now.

कुरखेडा तहसील कार्यालयासमोरील घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कुरखेडा, दि. २७ मार्च: कुरखेडा तहसील कार्यालयासमोर उभ्या असलेल्या कारने अचानक पेट घेतला यामध्ये सुदैवाने प्राणहानी झाली नसली तरी आगीमुळे कारचे अतोनात नुकसान झाले. सदर घटना आज शनिवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

     आरमोरी येथील भाकपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल मारकवार यांच्या मालकीची असलेली टाटा इंडिगो एम एच ३३ ऐ ३२१८ या क्रमांकाची कार स्वतः मारकवार चालवीत होते. दरम्यान पाण्याची बाटली घेण्यासाठी मारकवार यांनी तहसील कार्यालयासमोर  रस्त्याच्या कडेला कार उभी करून समोरच्या हॉटेलमध्ये गेले असता, त्यांच्या पाठीमागे कारने पेट घेतला.

     दरम्यान महावितरणच्या कार्यालयात आयोजित शिवसेनेच्या वतीने आंदोलन आटोपून परत येत असताना, माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांना कार इंजिनच्या भागातून पेट घेत असल्याचे लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतः कार्यकर्त्या सोबत समोरच्या हॉटेलमधून बादलीने पाणी घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतू कार दुसऱ्या बाजूने पेट घेत होती. थोड्यावेळाने नगरपंचायतीच्या अग्निशामक वाहनाने आग विझवण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी आंदोलनाच्या बंदोबस्तावर असलेले कुरखेडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर देडे, उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बघ्यांना घटनास्थळापासून दूर सारून कुरखेडा तळेगाव मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू केली. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही पुढील तपास कुरखेडा पोलिस करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.