Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज ३७ नवीन कोरोनाबाधित तर ५१ कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २७ मार्च: जिल्हयात आज ३७ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज ५१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित १०१३४ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ९९१३ वर पोहचली. तसेच सद्या ४१२ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण १०९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०१ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ३.९५ टक्के तर मृत्यू दर १.०४ टक्के झाला.

          नवीन ५६ बाधितांमध्ये गडचिरोलीतील १६, अहेरी तालुक्यातील ६, आरमोरी तालुक्यातील ४, भामरागड तालुक्यातील १,  चामोर्शी तालुक्यातील १, धानोरा तालुक्यातील १, एटापल्ली तालुक्यातील ०२, कोरची तालुक्यातील २, सिरोंचा १,  तर वडसा तालुक्यातील ३ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ५१ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील २२,  अहेरी ५, आरमोरी ३, भामरागड ०१, चामोर्शी ५, कोरची २,  कुरखेडा १, तर वडसा  मधील १२ जणांचा समावेश आहे.       

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

   नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये सोनापूर कॉम्पलेक्स १, सोनापूर वार्ड कलेकटर कॉलनी १, पोलीस कॉलोनी एमआयडीसी रोड ०१, होम गार्ड ऑफीस जवळ ०१, गोकुल नगर १, डिस्टी ऑफीस १, चामोर्शी रोड १, साई नगर ०२, सीआरपीएफ १, कन्नमवार वार्ड १, गांधी वार्ड १, स्थानिक २, आयटीआय चौक १, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक २, फॉरेस्ट कॉलोनी ०१,  आलापल्ली ०२, नागेपल्ली १,  आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये  पिसेवडधा १, स्थानिक २,  उदापूर १,  धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये  स्थानिक २, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये  स्थाविनक १, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये गुरनोली १, एस ओ  धात्रक जवळ १, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये विसोरा १, मधुवन कॉलोनी १, कुरुड १, तर इतर जिल्हयातील  बाधितामध्ये १ जणांचा समावेश आहे.

Comments are closed.