Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रेल्वे राज्यमंत्र्यांनी महापरिनिर्वाण दिनासाठी रेल्वेच्या तयारीचा आढावा घेतला

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 30 नोव्हेंबर :-  श्री रावसाहेब दानवे, मा. रेल्वे, कोळसा, खाण राज्यमंत्री, भारत सरकार यांनी श्री रामदास आठवले, मा. सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण राज्यमंत्री, भारत सरकार यांच्यासह महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज दि. ३०.११.२०२२ रोजी चर्चगेट येथील जनशिकायत कार्यालयात घेतली.

रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य आणि देशभरातून अनेक भाविक मुंबईत येत असतात. त्यांना रेल्वे स्थानकात अधिकाधिक सोयी उपलब्ध करून, त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यासाठीचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर बैठकीत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अनिल कुमार लाहोटी, पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक श्री प्रकाश बुटानी यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपापल्या विभागांतील घेण्यात आलेल्या पूर्वतयारीचे रेल्वे राज्यमंत्र्यांना सादरीकरण केले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अनिल लाहोटी यांनी स्पष्ट केले कि, महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या भाविकांना पूर्व नियोजित ब्लॉकचा कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल तसेच नियमित सेवा चालूच राहतील.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेतर्फे १४ अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. तसेच आदिलाबाद – मुंबई ट्रेनला १ अतिरिक्त कोचही जोडण्यात येणार आहे. त्याबाबत प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक श्री मुकुल जैन यांनी सविस्तर माहिती दिली. त्याशिवाय मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर व हार्बर मार्गावर १२ उपनगरी विशेष गाड्या चालविण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्याची माहिती मध्य रेल्वे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री रजनीश गोयल यांनी दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुंबईतील दादर तसेच अन्य स्थानकांवर एकाच वेळी होणाऱ्या गर्दीतील प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची विशेष ड्युटी देण्यात येईल अशी माहिती प्रधान मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापक श्री मनिजीत सिंह यांनी दिली. महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणाऱ्या अतिरिक्त गर्दीचे मॉनिटरींग व नियंत्रण करण्यासाठी आरपीएफने केलेल्या तयारीची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त श्री अमरेश कुमार यांनी बैठकीत दिली.

या बैठकीत पश्चिम रेल्वे प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक श्री चित्तरंजन स्वाइन; प्रधान मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापक श्री प्रवीण चंद्र परमार; प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त श्री पी. सी. सिन्हा; मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री नीरज वर्मा यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त करीत असलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावेळी मध्य रेल्वेचे व पश्चिम रेल्वेचे अन्य वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.