Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वारांगना महिलांना मिळाले पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने हक्काचे भाऊ, सांगलीतील सुंदरनगर येथील वारांगना वस्तीत रंगला भावबीजेचा भावनिक सोहळा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

सांगली, दि. १६ नोव्हेंबर: सांगलीच्या सुंदर नगर वारांगना वस्तीत आज एक अनोखा भावनिक कार्यक्रम पाहायला मिळाला. अपघाताने वारांगना व्यवसायात अडकलेल्या वारांगना महिलांना आज हक्काचे भाऊ मिळाले आहेत. वारांगना वस्तीतच दिवाळी भाऊबीजेच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने या बंधू प्रेमाने वारांगना महिला मात्र चांगल्याच भारावून गेल्या.  

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कुटुंबापासून दूर असलो तरी भाऊबीजेच्या सण साजरा करता आल्याने वारांगना महिलांनी आभार मानले.

देशभर सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना आपणही दिवाळी करावी, आपलेहीकुटुंब असावे , आपल्यालाही आपल्या भावांना ओवाळता यासाठी परिस्थितीमुळे या वेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या वारांगना महिलांच्या आयुष्यात आज आनंदाचा दिवस आला. आज सांगलीच्या सुंदरनगर वेश्या वस्तीतील वारांगना महिलांना आपली बहीण म्हणून ओवाळून घेण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. आज दीपावली भाऊबीजेच्या निमित्ताने सुंदरनगर वेश्या वस्तीत भाऊबीजेच्या अनोखा आणि हृदयस्पर्शी सोहळा रंगला. आणि या भाऊबीजेच्या कार्यक्रमामुळे अनेकांचे डोळेही पाणावले. सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी आयोजित केलेल्या या प्रेरणादायी उपक्रमात सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, नगरसेवक अभिजित भोसले, अनारकली कुरणे, महिला पोलीस अधिकारी प्रज्ञा देशमुख यांनी उपस्थिती लावत या वारांगणांच्या भाऊबीजेच्या कार्यक्रमाची रंगत वाढविली. हा भाऊबीजेच्या उपक्रम समाजासाठी मार्गदर्शक ठरला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या उपक्रमामध्ये सांगलीच्या सुंदर नगर मधील दोनशेहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वारांगना महिलांना फराळ वाटप करून त्यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन केले होते.

Comments are closed.