अकोला जिल्ह्यात स्थापित होणार देशातील दुसरी सर्वात मोठी घंटा
घंटेचा ध्वनी 3 किमीपर्यंत येईल ऐकू.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अकोला,12 जानेवारी :- अयोध्या येथील राम मंदिरानंतर आकार व वजनात ही देशातील दुसर्या क्रमांकाची सर्वात मोठी घंटा हे अकोला तालुक्यातील दहीहंडा येथील रुपनाथ महाराज संस्थानात स्थापित करण्यात येणार आहे. देशातील दुसर्या क्रमांकाची सर्वात मोठी घंटा आहे, अजस्त्र घंटा तब्बल 321 किलो वजनाची आहे.
ही घंटा उत्तर प्रदेशातील जनेश्वर येथे तयार करण्यात आली आहे. यात चांदी, जस्त, साउंड पावडर, कासे, तांबे आदी धातू मिसळले असून त्या व्दारे बनविलेल्या या घंटेचे वजन 321 किलो आहे. या घंटेसाठी 3 लाख 50 हजार रुपये खर्च आला असल्याचेही पोटे यांनी सांगितले. अयोध्या येथील राम मंदिरात 621 किलो वजनाची घंटा देशातील सर्वात मोठी असून, त्यानंतरची दुसरी सर्वात मोठी घंटा दहिहंडा येथील रुपनाथ मंदिरासाठी तयार करण्यात आल्याचे पोटे यांनी सांगितले.
3 किमीपर्यंत घुमणार ध्वनी
या अजस्त्र घंटेची किमया म्हणजे या घंटेमधून ओंकार हा ध्वनी निर्माण होऊन तो तब्बल 3 किमी पर्यंत ऐकू येत असल्याचेही त्यांनी सांगितले. ही घंटा थेट रुपनाथ महाराज संस्थानमध्ये नेण्यात येत असून तेथे आरती व पूजा अर्चनेने या घंटेची स्थापना करण्यात येणार आहे.
Comments are closed.