Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘पुष्पा 2’ च्या शूटिंगला सुरूवात

अल्लू अर्जुनचा खास लुक आला समोर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 31 ऑक्टोबर :- स्टायलिश स्टार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. ‘पुष्पा-द-रूल’ या सीक्वेलचे शूटिंग रविवारपासून सुरू झाले. या चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफर मिरोस्लाॅ कुबा ब्रोझेक याने इन्स्टाग्रमवर सेटवरील एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटो मध्ये अल्लू अर्जुनचा फस्ट लूक पहायला मिळतो. पुष्पा या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर अक्षरश धुमाकूळ घातला. त्याच्य सीक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.

निर्मात्यांना डिसेंबर 2022 मध्ये हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आणायचा होता. त्यामुळे त्याची शूटिंग खुप आधीच सुरू होणार होती. मात्र काही कारणास्तव शूटिंगचे शेड्यूल पुढे ढकलले गेले. अल्लू अर्जुनच्या या नव्या लूकवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या आठ महिन्याची प्रतिक्षा सकारात्मक ठरणार. फस्ट लूक पोस्टर पाहण्यासाठी चाहते खुप इच्छूक आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.