Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दररोज उशिरा जेवल्याने उद्भवू शकतात विविध समस्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 31 ऑक्टोबर :-  निरोगी राहण्यासाठी केवळ सकस आहार घेणे आवश्यक नाही तर ते योग्य वेळी घेने देखील खुप आवश्यक आहे. मात्र आजकालच्या धावपळीच्या जगात हे होतांना दिखत नाही. अनेकजण दुपारच्या कोणत्याही वेळेस जेवतात. त्यामुळे याचा शरीरावर वाईट परिणाम होवून विविध समस्या उद्भवू शकतात.

जेव्हा दुपारचे जेवण उशिरा जेवल्याने पचनसंस्था नीट काम करत नाही. आयुर्वेदानुसार, व्यक्तीने दुपार 12 ते 2 या वेळेत जेवण केले पाहिजे यावेळी तुमच्या शरीरात पित्ताचे प्राबल्य असते. जे अन्न पचण्यास मदत करते. अशा स्थितीत जेवण उशिरा केल्यास त्यातून उर्जा मिळण्याऐवजी चरबीत रूपांतर होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जेव्हा दुपारचे जेवण उशिरा करता तेव्हा पोट भरलेले राहते. त्यामुळे तुम्ही रात्रीचे जेवणही उशिरा करता. अशा परिस्थितीत जर तुम्ही झोपायच्या आधी खाल्ले तर तुम्हाला पोटात जळजळ, गॅस, निद्रानाश आणि फुगण्याची समस्या होउ लागते. सोबतच चयापचय क्रिया मंदावते. जर तुम्ही न्याहरी करून थेट दुपारचे जेवण केली आणि तेही वेळेवर नाही तर चयापचय हळूहळू मंदावयाला लागतो आणि त्यामुळे झपाट्याने वजन वाढते.

जेवण वेळेवर न घेतल्यास डोकेदुखी किंवा चिडचिड होउ शकते. त्याच वेळी जेवण वेळेवर नाही केल्यामुळे कामा लक्ष केंद्रीत करण्यास त्रास होतो आणि काम करावेसे वाटत नाही. अन्न हे आपल्या शरीरासाठी उर्जेचा मुख्य स्त्रोत आहे. परंतु जेव्हा तुम्ही दुपारचे जेवण उशिरा जेवता तेव्हा तुमच्या शरीरात पुरेशी उर्जा निर्माण होत नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

Comments are closed.