Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

क्लचला धक्का लागून ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला; तीन वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सांगली, दि. २४ जानेवारी: सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनेवाडी येथे ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने तेजस श्रीरंग माळी या तीन वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुनाथ श्रीरंग माळी हा त्याचा चार वर्षाचा भाऊ ट्रॅक्टरमधून खाली पडल्याने बचावला. दुर्घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली. कवठेमंकाळ पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे.

बनेवाडी येथील माळीवस्ती परिसरात श्रीरंग माळी यांची शेती आहे. शनिवारी ते शेतीतील कामासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले होते. गुरुनाथ व तेजस ही दोन्ही मुले सोबत शेतात आली होती. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दिवसभरात शेतातील कामे उरकून घरी जाण्यासाठी माळी हे ट्रॅक्टरमध्ये बसले. तसेच दोन्ही मुलांनाही ट्रॅक्टरमध्ये बसवले. यावेळी शेतीकामासाठी आणलेले साहित्य विसरल्याचे लक्षात आले. श्रीरंग माळी साहित्य विसरलेले आणण्यासाठी गेले. नेमक्या यावेळी ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या दोन मुलांपैकी एकाचा पाय चूकून ट्रॅक्टरच्या क्लचवरती पडला. यामुळे अगोदरच घसारीला उभा असलेला ट्रॅक्टर जोरदार वेगाने विहिरीच्या दिशेने गेला आणि विहिरीत पडला. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.